‘हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करा’, ओवेसींचं पंतप्रधान मोदींना आव्हान
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांना चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचं आव्हान दिलं आहे (Asaduddin Owaisi challenge modi government to surgical strike on China).
हैदराबाद : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदी यांना चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्याचं आव्हान दिलं आहे. ओवेसी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ओवेसी भाषण करताना दिसत आहेत. या भाषणात त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे (Asaduddin Owaisi challenge modi government to surgical strike on China). “भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर हैदराबादमध्ये सर्जिकल स्ट्राईक करु, असं वचन दिलं आहे. भाजप लडाखमध्ये अशी बहादुरी का दाखवत नाही, जिथे चिनी सैन्यांनी भारताच्या भूमीवर ताबा घेतला आहे”, असं ट्विटमध्ये ओवेसी म्हणाले आहेत.
तेलंगणाचे भाजप अध्यक्ष आणि खासदार बंडी संजय कुमार यांनी मंगळवारी (24 नोव्हेंबर) आपल्या भाषणात सर्जिकल स्ट्राईकबाबत वक्तव्य केलं होतं. “महापालिकेचं महापौर पद जिंकल्यानंतर भाजप सर्व रोहिंग्या आणि पाकिस्तानींना पळवून लावण्यासाठी जुन्या शहरात सर्जिकल स्ट्राईक करणार”, असं भाजप खासदार बंडी संजय कुमार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं.
“भाजपवाले तुम्ही असदुद्दीन ओवेसी भडकाऊ भाषण देतो असं म्हणतात. मी तुम्हाला पुन्हा आव्हान देतो, हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करुन दाखवा. गेल्या काही महिन्यांपासून लडाखमध्ये भारताच्या भूमीवर चिनी फौजेने ताबा घेतला आहे. नरेंद्र मोदी तिथे सर्जिकल स्ट्राईक करा. आता शांत का बसला आहात?”, असा सवाल ओवेसींनी केला.
“तुम्ही सर्जिकल स्ट्राईक करा, आम्ही तुमचं कौतुक करु. चिनी फौजेला उखाडून फेका. पण तिथे सर्जिकल स्ट्राईक करणार नाहीत. तुमचा एक नेता ओल्ड सिटीवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची भाषा करतो. तुम्ही खरंच शहरावर सर्जिकल स्ट्राईक करणार, तुम्ही शहरासाठी केलं तरी काय?”, असादेखील सवाल ओवेसी यांनी केला (Asaduddin Owaisi challenge modi government to surgical strike on China).
Some context for people outside Hyderabad: in the ongoing MUNICIPAL polls, BJP has promised a SURGICAL STRIKE against the people of Hyderabad if they win
They don’t show this bravado in Ladakh, where China has occupied Indian territory pic.twitter.com/kyfhKGMMuE
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) November 24, 2020
हेही वाचा :
Cyclone Nivar Live Update : ‘निवार’ चक्रीवादळाचा धोका, चेन्नई विमानतळ 12 तासांसाठी बंद