Bihar Election Result : बिहारमध्ये एमआयएम किंगमेकर ठरणार? 4 जागांवर विजय, तर एका ठिकाणी आघाडीवर

बिहारचा निकाल त्रिशंकू लागला तर एमआयएम किंग मेकर ठरणार असल्याची शक्यता आहे.

Bihar Election Result : बिहारमध्ये एमआयएम किंगमेकर ठरणार? 4 जागांवर विजय, तर एका ठिकाणी आघाडीवर
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 11:25 PM

पाटणा : बिहारच्या निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोल खोटे ठरले आहेत. सुरुवातीला स्पष्ट राजदकडे आणि नंतर बराच काळ भाजपकडे झुकलेली ही निवडणूक आता त्रिशंकू होण्याच्या दिशाने प्रवास करत आहेत. या सर्व घडामोडीमध्ये असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला मोठं यश मिळालं आहे. एमआयएमने 4 जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे बिहारचा निकाल त्रिशंकू लागला तर एमआयएम किंग मेकर ठरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ओवेसींचा पक्ष कुणाला पाठिंबा देणार हे पाहावं लागणार आहे (AIMIM big victory in Bihar Assembly Election 2020).

“सीमांचलच्या नागरिकांचं मनापासून आभार मानतो. बिहारमध्ये आम्ही जेव्हा आमच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हापासून आम्ही सीमांचलच्या नागरिकांना न्याय देणार असं सांगत आलो आहोत. गेल्या 60 वर्षात सीमांचलच्या नागरिकांना योग्य न्याय मिळाला नाही. हा प्रांत फक्त बिहारच नाही, तर संपूर्ण भारतातील सर्वाधिक अविकसित भाग आहे. न्यायाची लढाई सुरु राहील. आम्ही येथे शाळा, महाविद्यालय, चांगले रुग्णालय उभारणार आहोत”, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिली (AIMIM big victory in Bihar Assembly Election 2020).

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत एमआयएम पक्षाला 4 जागांवर यश आलं आहे. तर 1 जागेवर एमआयएम आघाडीवर आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बिहारच्या जनतेचं आणि मित्र पक्षांचे आभार मानले. त्याचबरोबर बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेले हैदराबाद, बिहार आणि महाराष्ट्रातील एमआयएमच्या नेत्यांचे आभार मानले (AIMIM big victory in Bihar Assembly Election 2020).

‘या’ जागांवर एमआयएमची बाजी

बिहारच्या अमौर, कौचाधामन यासह एकूण 4 मतदारसंघांमध्ये एमआयएमचे उमेदवार जिंकले आहेत. अमौर मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान यांना तब्बल 85 हजार 391 मतं मिळाली आहेत. तर कौचाधामन मतदारसंघात मोहम्मद इजहर अस्फी यांना 79 हजार 548 मतं मिळाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly election 2020) एमआयएम पक्षाने 20 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम मतदार सर्वाधिक असणाऱ्या सीमांचल प्रांतात एमआयएमने आपले 14 उमेदवार उभे केले होते.

विशेष म्हणजे 2015 च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचल प्रांतात काँग्रेसला सर्वाधिक जागांवर यश मिळालं होतं. काँग्रेसने या प्रांतात 9 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर जेडीयूने 6 तर आरजेडीने 3 जागांवर विजय मिळवला होता. भाजपने या प्रांतात 6 तर भाकपाला 1 जागेवर समाधान मानावं लागलं होतं.

एमआयएमने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत सीमांचल प्रांतात 6 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यावेळी एमआयएमच्या हाती फारसं यश आलं नव्हतं. पण कोचाधामन मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार अख्तरुल इमान दुसऱ्या नंबरवर होते.

दरम्यान, 2019 साली किशनगंज येथे झालेल्या पोटनिवडणुकीत एमआयएमने जोर लावला होता. अखेर त्या पोटनिवडणुकीत आपलं खातं खोलण्यात एमआयएमला यश आलं होतं. सध्या सीमांचल प्रांतात भाजपचे उमेदवार आघाडीवर दिसत आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकार काँग्रेस तर तिसऱ्या क्रमांकावर एमआयएमचे उमेदार आघाडीवर दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

Bihar Election Result 2020! 50 लाखांची मतमोजणी अद्याप बाकी, कधीही चित्र पालटण्याची शक्यता

Bihar Election Result 2020 LIVE | नितीश कुमारांकडून निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव, राजदचा गंभीर आरोप

Bihar Election Result ! नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!

संबंधित व्हिडीओ :

Asaduddin Owaisi Party AIMIM may become King Maker in Bihar Election Result 2020

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.