‘भारत बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा: अशोक चव्हाण

भारत बंद यशस्वी करुन झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करण्याचं आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे. Ashok Chavan Bharat Band

'भारत बंद' यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा: अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 2:02 PM

नांदेड : केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत पंजाबचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीत सलग 12 व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन देशव्यापी झालं आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी सुरुवातीला बोलायला तयार नव्हते. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी बोललं तरी कायदे मागे घेत नसल्यामुळे चर्चा निष्फळ होत आहेत. कृषी कायद्यांबाबत केंद्राची भूमिका ताठर असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारत बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन अशोक चव्हाणांनी केले आहे.  ( Ashok Chavan appeal to participate in Bharat Band of Farmers)

केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असून, हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांंसंदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, त्यांना जागे करण्यासाठी ८ डिसेंबरचा ‘भारत बंद’ महत्वाचा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात केंद्रावरील दबाव वाढवावा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे. भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि कायदे कसे शेतकरी विरोधी आहेत, हे केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावे, असं अशोक चव्हाण म्हणाले. ( Ashok Chavan appeal to participate in Bharat Band of Farmers)

केंद्र सरकानं संसदेत कृषी विधेयक मांडण्यापासून ते मंजूर करेपर्यंत काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सातत्यानं कृषी कायद्यांना विरोध केला आहे. पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅलीद्वारे केंद्राच्या कायद्यांचा विरोध करण्यात आला, अशोक चव्हाण यांनी सांगितलं. राज्यातील काँग्रेसने कृषी कायद्यांविरोधात करणारी लाखो पत्र पाठवली आहेत. काँग्रेसतर्फे विविध ठिकाणी कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलींचे आयोजन केले होते. ( Ashok Chavan appeal to participate in Bharat Band of Farmers)

औरंगाबादमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन

दिल्ली चलो आंदोलनांतर्गत दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादमध्ये युवक काँग्रेसनं निदर्शनं केली. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसनं घोषणाबाजी केली. औरंगाबादमधील क्रांती चौक या ठिकाणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थानार्थ घोषणाबाजी केली.

संबंधित बातम्या:

कृषी विधेयकविरोधी आंदोलनात राहुल गांधी यांची उडी, ट्रॅक्टर चालवून नोंदवणार निषेध

Farmer Protest | दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ, कृषी कायद्यांच्या विरोधात युवक काँग्रेस मैदानात

( Ashok Chavan appeal to participate in Bharat Band of Farmers)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.