Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन दिवाळीत नाशिकमध्ये 3 एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न; बोनससह हाती फक्त साडेचार हजारांचा पगार आल्याने घेतले विष

ऐन दिवाळीत नाशिकमध्ये तीन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. यात एका कर्मचाऱ्याला बोनस आणि पगारासह हाती फक्त साडेचार आल्याने त्याने विष घेतल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ऐन दिवाळीत नाशिकमध्ये 3 एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न; बोनससह हाती फक्त साडेचार हजारांचा पगार आल्याने घेतले विष
आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 12:28 PM

नाशिकः ऐन दिवाळीत नाशिकमध्ये तीन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. यात एका कर्मचाऱ्याला बोनस आणि पगारासह हाती फक्त साडेचार आल्याने त्याने विष घेतल्याचे समोर आले आहे. या कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी एकीकडे विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकार पातळीवर त्याबाबत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, त्यावर अजून ठोस तोडगा निघत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यातच इगतपुरी तालुक्यात दोन कर्मचाऱ्यांनी आणि कळवणध्ये एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनांनी कर्मचाऱ्यांमध्ये पराकोटीचा संताप आहे. इगतपुरी तालुक्यातील दहा कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे एकाने रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्याने गळफास घेण्याचा. कळवणमध्ये प्रमोद शिवाजी सूर्यवंशी (वय 38 रा. वाजगाव, ता. देवळा) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सूर्यवंशी यांनी सुट्टी घेतली होती. त्यासाठी पगारी रजेचा अर्ज दिला. मात्र, ही सुट्टी मंजूर झाली नाही. परिणामी हातात फक्त दोन हजारांचा पगार आणि बोनस मिळून फक्त साडेचार हजार रुपये आहे. या पैशात दिवाळी कशी साजरी करायची, घर कसे भागायचे यातून त्यांनी विषारी औषध घेतले. त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांचावर उपचार सुरू आहेत.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे. दररोज सुमारे 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेळेववर वेतन दिले जात नाही. कोरोना काळात एसटीच्या 306 कर्मचाऱ्यांनी प्राणाची आहुती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना एच. आर. वेळेवर मिळत नाही, डीए वेळेवर मिळत नाही. राज्यातील प्रत्येक संकटाच्या वेळी एसटी कर्मचारी पुढे असतो. तरीही त्याच्यावर अन्याय होतो म्हणून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यात दिवाळी तोंडावर 27 ऑक्टोबरपासून उपोषण सुरू करण्यात आले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे. सोबतच एसटीचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी अंतिम लढाईची तयारी एसटी कर्मचाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात आले आहे. (Attempted suicide of 3 ST employees in Nashik during Diwali; The condition of one is serious)

इतर बातम्याः

Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी लेफ्ट जन. डॉ. माधुरी कानिटकर

अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका
बॅरिस्टर जिनांनाही मुस्लिमांची इतकी काळजी नव्हती, राऊतांची टीका.
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू
रुग्णालयाचा हलगर्जीपणा नडला; गर्भवती महिलेचा मृत्यू.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले.
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले
मी युटी म्हणजे युज अँड थ्रो म्हणू का?, 'एसंशिं' वर एकनाथ शिंदे संतापले.
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी
दानवे काय एवढा मोठा विरोधी पक्ष नेता आहे का? चंद्रकांत खैरेंची नाराजी.
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या
MNS Protest : मनसेचा धडक मोर्चा; झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण कार्या.
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला
हरणाच्या शिकारी प्रकरणी खोक्याचा ताबा वन विभागाने घेतला.
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर
नाही मातीत घातला तर मग बोला', दादांचा सज्जड दम देत कोणाला घेतलं फैलावर.