औरंगाबादमध्ये रुग्णांचा आकडा वाढताच, सकाळी आणखी 17 नवे कोरोना रुग्ण
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. औरंगाबादमध्ये आज (7 मे) 17 जणांना कोरोनाची लागण (Aurangabad Corona Virus Update) झाली आहे.
औरंगाबाद : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. औरंगाबादमध्ये आज (7 मे) 17 जणांना कोरोनाची लागण (Aurangabad Corona Virus Update) झाली आहे. तर काल (6 मे) दिवसभरात एकूण 35 कोरोना रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत 373 कोरोना रुग्ण आढळले (Aurangabad Corona Virus Update) आहेत.
दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. तर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरातच 35 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांनी दिली.
औरंगाबादेतील सहा दिवसातील रुग्णांची वाढ
तारीख – रुग्ण
- 1 मे – 39
- 2 मे – 23
- 3 मे – 17
- 4 मे – 47
- 5 मे – 24
- 6 मे – 28
औरंगाबादेत 1 मे रोजी 39 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2 मे रोजी औरंगाबादेत आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यानंतर 3 मे रोजी 17 रुग्ण, 4 मे रोजी 47 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर 5 आणि 6 मे रोजी अनुक्रमे 24 आणि 28 कोरोनाची रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे गेल्या 6 दिवसात एकट्या औरंगाबादेत 178 रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा अलर्टवर आला आहे.
संबंधित बातम्या :
Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 426 वर, एकट्या मालेगावात 349 रुग्ण
नागपुरात एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण, 11 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट