औरंगाबादेत नातेवाईकांनी जंगलात सोडलेल्या 90 वर्षीय आजीची कोरोनावर मात

औरंगाबादमधील मदर तेरेसा वृद्धाश्रमात त्या आजींची सुश्रुषा केली जाणार आहे. (Aurangabad Corona positive grandmother tested negative)

औरंगाबादेत नातेवाईकांनी जंगलात सोडलेल्या 90 वर्षीय आजीची कोरोनावर मात
Follow us
| Updated on: Aug 26, 2020 | 10:30 AM

औरंगाबाद : एका 90 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आजीबाईंना त्यांच्या नातेवाईकांनीच जंगलात सोडून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या 90 वर्षाच्या कोरोनाबाधित आजीने कोरोनावर मात केली आहे. त्यानंतर आता औरंगाबादमधील मदर तेरेसा वृद्धाश्रमात त्या आजींची सुश्रुषा केली जाणार आहे. (Aurangabad Corona positive grandmother tested negative)

औरंगाबादमधील कच्चीघाटी परिसरात काही नातेवाईकांनी आपल्या 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना थेट जंगलात सोडलं. शनिवारी 8 ऑगस्टला हा सर्व प्रकार समोर आला होता. तब्बल 18 दिवसानंतर या आजींनी कोरोनावर मात केली आहे. या आजी कोरोनामुक्त झाल्यानंतरही तिचे कोणीही नातेवाईक तिला घरी नेण्यासाठी किंवा बघण्यासाठी आले नाही. त्यामुळे या निराधार आजीला पोलिसांनी चिखलठाना जवळील वृद्धाश्रमात दाखल केलं आहे. औरंगाबादच्या मदर तेरेसा वृद्धाश्रमात त्या आजींची सुश्रुषा केली जाणार आहे.

नेमकी घटना काय?

औरंगाबादमधील कच्चीघाटी परिसरात 8 ऑगस्टला एका 90 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह आजीबाईंना त्यांच्या नातेवाईकांनीच जंगलात सोडून दिलं होतं. यानंतर या घटनेने एकच खळबळ उडाली होती. जर्जर म्हाताऱ्या आजींना जंगलात टाकून संबंधित नातेवाईक फरार झाले होते. या आजींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

आजीला जंगलात सोडून पळून गेलेल्या नातेवाईकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच या नातेवाईकांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती.  (Aurangabad Corona positive grandmother tested negative)

संबंधित बातम्या :

औरंगाबादेत कोरोनाग्रस्त 90 वर्षीय आजीला जंगलात सोडलं, निर्दयी नातेवाईक पसार, गुन्हा दाखल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.