Aurangabad | जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा, शेख शाहरुख, प्रमोद काळे, प्रतिक्षा काटे, सुरेखा गाडे यांना दुहेरी मुकूट

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ॲथलेटिक्स मैदानावर औरंगाबाद जिल्हा हौशी अथलेटिक्स संघटनेच्या वतीने वरिष्ठ गटाच्या मुलांच्या व मुलींच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

Aurangabad | जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा, शेख शाहरुख, प्रमोद काळे, प्रतिक्षा काटे, सुरेखा गाडे यांना दुहेरी मुकूट
औरंगाबाद जिल्हा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेला भरभरून प्रतिसादImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 3:46 PM

औरंगाबाद| डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) ॲथलेटिक्स मैदानावर औरंगाबाद जिल्हा हौशी अथलेटिक्स संघटनेच्या (District Amateur Athletics) वतीने वरिष्ठ गटाच्या मुलांच्या व मुलींच्या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये शेख शाहरुख याने 100मी आणि 200 मी, प्रतीक्षा काटे हिने 800 मी आणि 1500 मी तर प्रमोद काळे आणि सुरेखा गाडे हिने गोळा फेक आणि थाळी फेकमध्ये सुवर्ण पदक (Gold medal) जिंकत जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत दुहेरी मुकुट पटकावले. सकाळी 6.30 वाजता राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे निरीक्षक राकेश सावे यांच्या हस्ते निशाणी दाखवून व जिल्हा अॅथलेटिक्स संघटनच्या उपाध्यक्षा प्राचार्या शशिकला निलवंत आणि सचिव डॉ.फुलचंद सलामपुरे यांच्या उपस्तिथीत स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. तर राज्य संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे आणि जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. रंजन बडवणे आणि यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. ॲथलेटिक्सच्या विविध क्रीडा प्रकारात संपर्ण झालेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून 360 खेळाडू सहभागी झाले होते.

स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे-

मुले: 100 मीटर धावणे: प्रथम- शेख शाहरुख, द्वितीय- ऋषिकेश घाडगे, तृतीय- प्रवीण वैराळ, 200 मीटर धावणे: प्रथम- शेख शाहरुख, द्वितीय- शिवाजी हिडो, तृतीय- कार्तिक जाधव, 400 मीटर धावणे: प्रथम- शिवाजी हीडो, द्वितीय- ऋषी साळवे, तृतीय- आकाश चव्हाण, 800 मीटर धावणे: प्रथम- रमेश वळवी, द्वितीय- परमेश्वर राठोड, तृतीय- नितीन टेमके, 1500 मीटर धावणे: प्रथम- प्रवीण वाघमोडे, दुतीय- जगदीश चव्हाण, तृतीय- किशोर जोघारी, 5000 मीटर धावणे: प्रथम- कुलदीप चव्हाण, द्वितीय- प्रदीप राजपूत, तृतीय- विष्णू तांबडे, गोळा फेक: प्रथम- प्रमोद काळे, द्वितीय- रवींद्र थोरे, तृतीय- पी चव्हाण,

थालीफेक: प्रथम- प्रमोद काळे, द्वितीय- शुभम पवार, तृतीय- जितेंद्र ठेंगे, भालाफेक: प्रथम- रवींद्र ठोंबरे, द्वितीय- जितेंद्र ठेंगे, तृतीय- शुभम पवार.

मुली: 100 मीटर धावणे- प्रथम प्रिया काळे, द्वितीय पूजा पवार, तृतीय सलोनी बावणे, 200 मीटर धावणे- प्रथम आरती सातदिवे, द्वितीय सोनाली बावणे, तृतीय नीतू राजपूत, 400 मीटर धावणे- प्रथम धनश्री माने, द्वितीय- गायत्री गोरे, 800 मीटर धावणे- प्रथम प्रतीक्षा काटे, द्वितीय रूपाली बडगे, तृतीय पूजा पवार, 1500 मीटर धावणे- प्रथम प्रतीक्षा काटे, 5000 मीटर धावणे- प्रथम रूपाली बारगजे, द्वितीय पूजा अहिरे, तृतीय गायत्री गोरे, भालाफेक- प्रथम सपना चव्हाण, द्वितीय प्राजक्ता थालीखेडकर, तृतीय दीक्षा रोडगे, लांब उडी- प्रथम नीतू राजपूत, द्वितीय शालू चव्हाण, तृतीय संगीता शिंदे, गोळा फेक- प्रथम सुरेखा गाडे, द्वितीय अर्चना चव्हाण, तृतीय दीक्षा रोडगे, थाळी फेक- प्रथम सुरेखा गाडे, द्वितीय अर्चना चव्हाण, तृतीय दीक्षा रोडगे.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी डॉ.दयानंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल निळे, सचिन देशमुख, शशिकांत सिंग, भरत रेड्डी, राहुल आहिरे यांनी पंच म्हणून कामगिरी केली.

इतर बातम्या-

Aurangabad | Samruddhi Highway वरील सावंगी इंटरचेंजचा अंडरपास प्रगतीपथावर, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी

Rahul Gandhi: मी सत्तेच्या वर्तुळात वाढलो, पण मला सत्तेत स्वारस्य नाही: राहुल गांधी

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.