राजकीय खलबतांनंतर औरंगाबाद दूध संघातील 7 संचालकांची बिनविरोध निवड, उर्वरीत जागांसाठी भाजप-काँग्रेस आमने-सामने

विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवडणूक होण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र सुरेश पठाडे यांनी बागडे यांच्याविरोधातला अर्ज कायम ठेवला आहे.

राजकीय खलबतांनंतर औरंगाबाद दूध संघातील 7 संचालकांची बिनविरोध निवड,  उर्वरीत जागांसाठी भाजप-काँग्रेस आमने-सामने
दूध संघाच्या उर्वरीत सात जागांसाठी भाजप विरुद्ध काँग्रेसची चुरशीची लढत
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 7:00 AM

औरंगाबाद। जिल्ह्यातील सहकारी दूध संघाची निवडणूक प्रक्रिया अत्यंत उत्कंठावर्धक होत असून मंगळावारी यासाठी मोठी राजकीय खलबतं घडली. मंगळवारी या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. संघाचे विद्यमान अध्यक्ष व भाजप नेते आ. हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड व्हावी, यासाठी रोहयो मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दूध संघात रात्री उशीरापर्यंत ठाण मांडून प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. फक्त पैठण मतदार संघातून विद्यमान उपाध्यक्ष नंदलाल काळे यांची निवड होऊ शकली. 74 पैकी 53 उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.  एकूण 14 पैकी 7 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. आता उर्वरीत जागांसाठी येत्या 22 जानेवारी रोजी मतदान होईल.

7 संचालकांची बिनविरोध निवड

दूध संघातील सात मतदारसंघातील संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- पैठण- विद्यमान उपाध्यक्ष नंदलाल काळे सिल्लोड- श्रीरंग साळवे गंगापूर- दिलीप निरफळ खुलताबाद- सविता आधाने सोयगाव- सुमित्रा चोपडे ओबीसी मतदारसंघ- राजेंद्र जैस्वाल अनुसूचित जाती जमाती मतदार संघ- इंदूबाई सुरडकर हे विजयी झाले.

आता 7 जागांवर निवडणूक

येत्या 22 जानेवारी रोजी दूध संघातील उर्वरीत सात जागांसाठी निवडणूक होईल. विद्यमान अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवडणूक होण्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र सुरेश पठाडे यांनी बागडे यांच्याविरोधातला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे बागडे यांनीदेखील फुलंब्रीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांचे समर्थक संदीप बोरसे यांच्याविरुद्धचा राजेंद्र पाथ्रीकर यांचा अर्ज कायम ठेवला. त्यामुळे आता औरंगाबाद, फुलंब्री, कन्नड, वैजापूर या तुलका मतदारसंघांच्या जागांसाठी निवडणूक होईल.

इतर बातम्या-

बापरे… स्वामी विवेकानंद यांनी क्रिकेटमध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं होतं…हे आहे त्यागील इंटरेस्टिंग कारण !!

TET Exam Scam |2013 पासून टीईटीद्वारे भरती झालेल्या राज्यातील शिक्षकांच्या बाबतीत शिक्षण परिषदेने घेतला मोठा निर्णय

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....