Farmer Protest | दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ, कृषी कायद्यांच्या विरोधात युवक काँग्रेस मैदानात
औरंगाबादमध्ये युवक काँग्रेसनं कृषी कायद्याविरोधात आंदोलन केले. Aurangabad youth congress protest
औरंगाबाद: केंद्र सरकारनं सप्टेंबर महिन्यात मंजूर केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करत पंजाबचे शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाबच्या शेतकऱ्यांचे दिल्लीत सलग 12 व्या दिवशी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून पाठिंबा मिळू लागलाय. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ व कृषी कायद्याच्या विरोधात औरंगाबादमध्ये युवक काँग्रेस मैदानात उतरलं आहे. (Aurangabad Youth Congress protest against agriculture act of Central Govt)
देशभरात कृषी विधेयकास मोठा विरोध पाहायला मिळत आहे. दिल्ली चलो आंदोलनांतर्गत दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादमध्ये युवक काँग्रेसनं निदर्शनं केली. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आज युवक काँग्रेसनं घोषणाबाजी केली. औरंगाबादमधील क्रांती चौक या ठिकाणी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ आणि शेतकरी आंदोलनाच्या समर्थानार्थ घोषणाबाजी केली. (Aurangabad Youth Congress protest against agriculture act of Central Govt)
कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आंदोल
केंद्र सरकार जोपर्यंत कृषी कायदे रद्द करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु राहील, असा इशारा युवक काँग्रेसनं दिला आहे. जोपर्यंत कायदे रद्द केले जाणार नाहीत. तोपर्यंत शेतकरी रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळेल, असा इशारा केंद्र सरकारला देण्यात आला. (Aurangabad Youth Congress protest against agriculture act of Central Govt)
केंद्र सरकानं संसदेत कृषी विधेयक मांडण्यापासून ते मंजूर करेपर्यंत काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सातत्यानं कृषी कायद्यांवरुन नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील काँग्रेसने कृषी कायद्यांविरोधात करणारी लाखो पत्र पाठवली आहेत. काँग्रेसतर्फे विविध ठिकाणी कृषी कायद्यांच्या विरोधात ट्रॅक्टर रॅलींचे आयोजन केले होते.
प्रियांका गांधींचा केंद्रावर निशाणा
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे. ‘नव्या संसदेसाठी केंद्र सरकारचे 20 हजार कोटी रुपये आहेत. पंतप्रधानांसाठी विशेष विमान खरेदी करण्यासाठी 16 हजार कोटी रुपये आहेत. मात्र उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे 14 हजार कोटी रुपये नाहीत. 2017 पासून उत्तर प्रदेशात उसाचा भाव वाढला नाही. हे सरकार फक्त अब्जाधिशांपुरताच विचार करतं,’ असा घणाघात प्रियंका गांधी यांनी केलाय.
भाजपा सरकार के पास
?20,000 करोड़ का नया संसद कॉरिडोर बनाने ?16,000 करोड़ का पीएम के लिए स्पेशल जहाज खरीदने का पैसा है।
लेकिन यूपी के गन्ना किसानों को 14000 करोड़ भुगतान कराने का पैसा नहीं है। 2017 से गन्ने का मूल्य नहीं बढ़ा है।
ये सरकार केवल अरबपतियों के बारे में सोचती है pic.twitter.com/KwEa7f8PY4
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 7, 2020
संबंधित बातम्या:
कृषी विधेयकविरोधी आंदोलनात राहुल गांधी यांची उडी, ट्रॅक्टर चालवून नोंदवणार निषेध
(Aurangabad Youth Congress protest against agriculture act of Central Govt)