संतांचा शिवसेनेवर संताप, उद्धव ठाकरेंनी अयोध्येत येऊ नये, हनुमानगढीच्या महंतांचा इशारा
राज्यसरकारने त्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही," असेही महंत नरेंद्र गिरी म्हणाले. (Ayodhya Saints Support Kangana Ranaut warns CM uddhav thackeray)
नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना रनौतच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या वादात आता अयोध्येतील साधू-संत आणि विश्व हिंदू परिषदेने उडी घेतली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापुढे अयोध्येत येऊ नये. जर ते येथे आलेच तर त्यांचे कोणीही स्वागत करणार नाही, उलट त्यांना या ठिकाणी विरोध पत्करावा लागेल,” अशा इशारा अयोध्येतील संत आणि विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. (Ayodhya Saints Support Kangana Ranaut warns CM uddhav thackeray)
“कंगना रनौत ही या देशाची शूर आणि धाडसी मुलगी आहे. तिने बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांच्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. तिने बॉलिवूडच्या एका विशेष ग्रुपच्या विरोधात आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही बॉलिवूड माफिया नव्हे तर सरकारही घाबरुन आहे. शिवसेना आता सोनिया सेना झाली आहे, जी कोणी व्यक्ती सरकारविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याविरोधात आरोप लावून कारवाई केली जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यापुढे अयोध्येत येऊ नये अशी धमकी दिली,” अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी दिली.
हनुमान गढीजवळील मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याप्रकरणीही विरोध केला आहे. “जर यापुढे शिवसेनेचा कोणताही नेता अयोध्येत येत असेल, तर त्याला कड़ाडून विरोध केला जाईल.” असे राजू दास म्हणाले.
“महाराष्ट्रातील कायदा आणि व्यवस्थेची स्थिती अंत्यंत वाईट आहे. पालघरमध्ये दोन साधूंची हत्या करण्यात आली होती. मात्र राज्यसरकारने त्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही,” असेही महंत नरेंद्र गिरी म्हणाले.
“कंगना रनौतच्या या लढाईत संपूर्ण देश तिच्यासोबत आहे. हिमाचल प्रदेशच्या सरकारने तिला सुरक्षा दिल्याप्रकरणी त्यांचे धन्यवाद,” असेही ते म्हणाले.
“अयोध्येत प्रत्येक हिंदू जाऊ शकतो, विश्व हिंदू परिषद काही ठेकेदार नाही. आम्ही ही हिंदू आहोत. उद्धव ठाकरे यापूर्वीही योध्येत जाऊन आले आणि त्यांना वाटलं तर कधीही जाऊ शकतात” असं मत कॅबीनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. (Ayodhya Saints Support Kangana Ranaut warns CM uddhav thackeray)
संबंधित बातम्या :
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी, गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना आदेश
“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट