Corona | ‘बेबी डॉल’ गायिका कनिका कपूरला कोरोना, विमानतळावरुन पळाल्याचा आरोप
बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
लखनऊ : बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका कनिका कपूरला (Kanika Kapoor Found Corona Positive) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आज लखनऊमध्ये ज्या चार जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यापैकी एक कनिका कपूरही आहे. कनिका कपूरने स्वत: (Kanika Kapoor Found Corona Positive) सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं.
विमानतळावर तिचं थर्मल स्क्रॅनिंग झालं होतं. (Kanika Kapoor Found Corona Positive) मात्र, तेव्हा तिला कोरोना झाल्याची लक्षणं नव्हती असंही तिने सांगितलं. मात्र, ती विमानतळावरुन पळून गेल्याचा आरोप तिच्यावर होतो आहे. ‘आज तक’च्या बातमीनुसार, कनिका कपूर ही विमानतळावरील ग्राऊंड स्टाफच्या मदतीने बाथरुममध्ये लपली, त्यानंतर तिने तेथून पळ काढला. कनिका ही 15 मार्चला लंडनहून लखनऊला आली होती.
हेही वाचा : मुंबई, पुणे ते नागपूर, 31 मार्चपर्यंत कुठे काय चालू राहणार?
कनिकाने रविवारी 15 मार्चला लखनऊ येथील शालिमार गॅलंट अपार्टमेंटमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये लखनऊचे अनेक बडे अधिकारी आणि नेते मंडळी सहभागी झाले होते. या पार्टीमध्ये एकूण 125 जण सहभागी झाल्याची माहिती आहे. कनिकाला कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण इमारतीत गोंधळ उडाला आहे. प्रत्येकजण घाबरलेला आहे. तसेच, या पार्टीमध्ये कॅटेरिंग सर्व्हिस पुरवलेले कर्मचारीही दहशतीखाली आहेत.
याशिवाय, कनिका ही लखनऊच्या ताज हॉटेलमध्ये थांबल्याचीही माहिती आहे. तर शालिमार गॅलंट अपार्टमेंटमधील अनेकजण ही माहिती मिळाल्यानंतर इमारत सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत. कमिका कपूरचं संपूर्ण कुटुंब या इमारतीत राहातं. आता तिच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
आरोग्य विभागाकडून त्या सर्वांना फोन
कनिका कपूरला कोरोना झाल्याचं कळताच लखनऊ आरोग्य विभागाने तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला फोन केला आहे. त्या सर्व लोकांनी स्वत:ला क्वारंटाईन करावं असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. तसेच, कनिकाच्या संपर्कात आलेल्या कुठल्याही व्यक्तीला अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही, (Kanika Kapoor Found Corona Positive) असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :
कोरोना vs ठाकरे सरकार : दिवसभरातील महत्त्वाचे निर्णय
पहिली ते आठवी परीक्षा रद्द, नववी आणि 11 वीची परीक्षा 15 एप्रिलनंतर
Corona | बीड जिल्ह्यातील 200 पेक्षा अधिक वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा दाखल
Corona | सिंगापूरमध्ये अडकलेले 50 भारतीय विद्यार्थी मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी मायदेशी