Gold Purchase | दुकाने सुरु होताच बारामतीकरांची सराफा दुकानात गर्दी, एकाच दिवसात 30000000 रुपयांची सोने खरेदी

लॉकडाऊनच्या काळात तब्बल दोन महिन्यांनी सराफ बाजार उघडला आणि दुकानं सुरु होताच बारामतीकरांनी एकच गर्दी केली

Gold Purchase | दुकाने सुरु होताच बारामतीकरांची सराफा दुकानात गर्दी, एकाच दिवसात 30000000 रुपयांची सोने खरेदी
तज्ज्ञांच्या मते, पुढच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 60 ते 65 हजार प्रति 10 ग्रामपर्यंत पोहोचेल असं बोललं जात आहे.
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 10:23 PM

बारामती : लॉकडाऊनच्या काळात तब्बल दोन महिन्यांनी (Baramati 3 Crore Gold Purchased) सराफ बाजार उघडला आणि दुकानं सुरु होताच बारामतीकरांनी एकच गर्दी केली. बारामतीत एकाच दिवसात तब्बल 3 कोटी रुपयांचं सोनं खरेदी करण्यात आलं आहे.  बारामतीत दुकानं सुरु झाल्यावर पहिल्याच दिवशी बारामतीच्या सराफ बाजारपेठेत सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. सराफ व्यावसायिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल (15 मे) एकाच दिवसात तब्बल 3 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री झाली आहे.

दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सराफ व्यावसायिकांनी दुकानं उघडल्यानंतर ग्राहकांची संख्या रोडावेल, लोक सोने खरेदी करणार नाहीत, असे सगळे अंदाज फोल ठरवत बारामतीकरांनी सोन्याची लयलूट केली आहे.

शेअर्समध्ये होणारे कमालीचे चढउतार, बाजारातील मंदीची परिस्थिती, बँकाच्या ठेवींवरील झपाट्याने घसरत चाललेले व्याजदर, बँकाबाबत निर्माण झालेली काहीशी अविश्वासाची भावना तसेच, लग्नसराईचा मोसम यामुळे सोन्याला चांगली मागणी वाढल्याचे काही सराफ व्यावसायिकांनी (Baramati 3 Crore Gold Purchased) सांगितले.

दुसरीकडे, लॉकडाउनमुळे लग्नाची पध्दतच बदलून गेली आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न होऊ लागल्याने इतर सर्व खर्च कमी झाले आहेत. त्यामुळे उर्वरित पैसे लोकांनी सोन्यात गुंतविल्याचे बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.

Baramati 3 Crore Gold Purchased

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Cases | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजार पार, दिवसभरात 67 मृत्यू, 1606 नवे रुग्ण

रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर, 24 तासात 32 पॉझिटिव्ह, कुठे किती रुग्ण?

Solapur Corona | सोलापुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, आकडा 360 वर

Aurangabad Corona : सकाळी 30 रुग्ण वाढले, दुपारी 28, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 900 पार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.