VIDEO | ‘बिहार के रॉबिनहूड’…, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारताच गुप्तेश्वर पांडेंवर रापचिक सॉन्ग

सोशल मीडियावर 'बिहार के रॉबिनहूड' नावाने त्यांच्यावरील गाणं जोरदार व्हायरल झालं आहे. (Bihar DGP Gupteshwar Pandey Viral Video Song Bihar Ke Robinhood)

VIDEO | 'बिहार के रॉबिनहूड'..., स्वेच्छानिवृत्ती स्वीकारताच गुप्तेश्वर पांडेंवर रापचिक सॉन्ग
Follow us
| Updated on: Sep 23, 2020 | 6:53 PM

पाटणाबिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी मंगळवारी (22 सप्टेंबर) संध्याकाळी स्वेच्छानिवृत्ती घेतली. फेब्रुवारी 2021 ही त्यांची निवृत्तीची तारीख होती मात्र पाच महिने अगोदरच त्यांनी निवृत्ती घेणं पसंत केलं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने देशभरात त्यांच्या निवृत्तीबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. अशातच सोशल मीडियावर ‘बिहार के रॉबिनहूड’ नावाने त्यांच्यावरील गाणं जोरदार व्हायरल झालं आहे. (Bihar DGP Gupteshwar Pandey Viral Video Song Bihar Ke Robinhood)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने गुप्तेश्वर पांडे राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच निवृत्ती घेतलेल्या दिवशीच त्यांच्यावरील गाणं व्हायरल झाल्याने त्यांचा राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांनी आता अधिक जोर धरला आहे.

बिग बॉसमध्ये दिसलेल्या दीपक ठाकूर यांनी ‘बिहार के रॉबिनहूड’ गाण्याचे शब्द लिहिलेले आहेत तर या गाण्याला आवाज देखील त्यांनीच दिला आहे. या गाण्याच्या व्हीडिओमध्ये गुप्तेश्वर पांडे यांच्यासोबत दीपक ठाकूर देखील दिसून येत आहेत.

या गाण्यामधून गुप्तेश्वर पांडे यांचं कौतुक केलं गेलं आहे. विशेष बाब म्हणजे अभिनेता सुशांत सिंह राजपूत केस प्रकरणामध्ये गुप्तेश्वर पांडे यांनी सीबीआयकडे केस देण्यासाठी किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

गुप्तेश्वर पांडे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या बातम्या गेल्या अनेक काळापासून येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी बक्सरच्या जनता दल युनायटेडच्या जिल्हाध्यक्षांची गुप्तेश्वर पांडे यांनी भेट घेतली होती. याप्रकरणावर त्यांना विचारला असता राजकीय प्रवेशाच्या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या होत्या.

गुप्तेश्वर पांडे यांची कारकीर्द

गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म 1961 मध्ये बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील गेरुबंध गावात झाला. पांडे यांनी पाटणा विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदवी संपादन केली. विशेष म्हणजे संस्कृतमधून त्यांनी यूपीएससीची परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्णही झाले. त्यानंतर ते आयकर अधिकारी झाले. दुसर्‍या प्रयत्नात आयपीएस परीक्षा पास होऊन त्यांनी पोलिस सेवेत प्रवेश केला.

गुप्तेश्वर पांडे यांनी याआधी 2009 मध्येही व्हीआरएस घेतली होती. भाजपच्या तिकिटावर बिहारमधील बक्सर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा मानस होता. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा अपुरी राहिल्याने नऊ महिन्यांनी बिहार सरकारकडे त्यांनी आपली निवृत्ती मागे घेण्याची विनंती केली.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यावेळी पांडे यांचा विनंती अर्ज मंजूर केला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ते बिहार पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते.

निवृत्तीनंतर गुप्तेश्वर पांडे यांची प्रतिक्रिया

मी आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षात सामील झालेलो नाही. आणि त्यावर अद्याप मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. सामाजिक कार्याचा प्रश्न असेल, तर ते मी राजकारणात प्रवेश न करताही करु शकतो, अशी प्रतिक्रिया गुप्तेश्वर पांडे यांनी दिली

(Bihar DGP Gupteshwar Pandey Viral Video Song Bihar Ke Robinhood)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.