Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमार यांना झटका, 63 टक्कांकडून सत्ता बदलाला पसंती

एक्झिट पोलमधून जनतेच्या कलाचा अंदाज वर्तवला जात आहे. यात बिहारमधील 63 टक्के लोकांनी सत्ता बदलाला पसंती दिली आहे.

Bihar Exit Poll : बिहारमध्ये नितीश कुमार यांना झटका, 63 टक्कांकडून सत्ता बदलाला पसंती
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 12:39 AM

पाटणा : बिहारच्या निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. यात आज (7 नोव्हेंबर) 78 मतदारसंघांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 50.96 टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी एकूण 55.70 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधीच एक्झिट पोलमधून जनतेच्या कलाचा अंदाज वर्तवला जात आहे. यात बिहारमधील 63 टक्के लोकांनी सत्ता बदलाला पसंती दिली आहे (Bihar Exit Poll 63 percent voters want to change in Bihar Government).

इंडिया टुडेच्या चाणाक्य एक्झिट पोलमध्ये बिहारमधील जनतेला बिहारमधील सरकार बदलवणार की नाही असा प्रश्न विचारण्यात आला. याला 63 टक्के नागरिकांनी सरकार बदलण्याचं मत नोंदवलं. तर 27 टक्के लोकांनी सरकार बदलायचं नसून आहे तेच ठेवायचं असल्याचं म्हटलं (Bihar Exit Polls). हा एक्झिट पोल करताना मतदारांना मत देताना कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे हाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर 35 टक्के लोकांनी बेरोजगारी हा मुख्य मुद्दा असल्याचं म्हटलं, तर 19 टक्के लोकांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. 34 टक्के लोकांनी इतर मुद्द्यांना महत्त्व दिलं.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांना रेटिंग देताना 21 टक्के मतदारांनी त्यांना चांगलं म्हटलं, 29 टक्क्यांनी सरासरी म्हटलं आणि 37 टक्के लोकांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना वाईट म्हटलंय.

Tv9 महाएक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 110 ते 120

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 115 ते 125

लोजप – 3 ते 5

अन्य – 10 ते 15

ABP न्यूज -सीव्होटरचा एक्झिट पोल भाजप + जदयू – एनडीए – 104 ते 128

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 108 ते 131

रिपब्लिक टीव्ही- जनकी बातचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 91 ते 117

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 136 ते 138

टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल

भाजप + जदयू – एनडीए – 116

राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120

लोजप – 1

अन्य – 6

(Bihar Vidhansabha Election Exit Poll Results

 Tv9 महा Exit PollABP News- Cvoterआज तक - अ‍ॅक्सिस माय इंडियारिपब्लिक भारत-जन की बातटाइम्स नाऊ-Cvoter
भाजप + जदयू - एनडीए110 ते 120104 ते 12891 ते 117116
राजद + काँग्रेस - महागठबंधन115 ते 125108 ते131136 ते 138120
लोजप3 ते 501
अन्य10 ते 1506

2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

राजद – 80 काँग्रेस – 27 जदयू – 71 भाजप – 53 लोजप – 2 रालोसप – 2 हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1 एकूण जागा – 243

मतदानाची टक्केवारी

पहिला टप्पा – 53.54 टक्के दुसरा टप्पा – 53 टक्के तिसरा टप्पा – 55.22 टक्के

कोणाच्या किती रॅली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी- 12 मुख्यमंत्री नितीश कुमार- 100 तेजस्वी यादव- 251 चिराग पासवान- 103 राहुल गांधी- 8 असदुद्दीन ओवैसी- 100

संबंधित बातम्या :

Bihar Election Exit Poll Live : NDA ला फटका बसण्याची चिन्हं, महागठबंधन झेप घेण्याचे संकेत, ‘TV9 महाएक्झिट पोल’चे अंदाज

Bihar Exit Poll 2020 : बिहारमध्ये कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी

Bihar Election Exit Poll : तेजस्वी तळपले, मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती

Bihar Exit Poll 63 percent voters want to change in Bihar Government

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.