जेपी नड्डांवरील हल्ल्याचे पडसाद, भाजपचा मुंबईत रास्तारोको; राज्यभर आंदोलनाचा इशारा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याचे मुंबईतही तीव्र पडसाद उमटले. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत या हल्ल्याचा निषेध नोंदवला. (bjp agitation in mumbai against attack on JP Nadda convoy in Bengal)

जेपी नड्डांवरील हल्ल्याचे पडसाद, भाजपचा मुंबईत रास्तारोको; राज्यभर आंदोलनाचा इशारा
Follow us
| Updated on: Dec 10, 2020 | 7:18 PM

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हल्ल्याचे मुंबईतही तीव्र पडसाद उमटले. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन करत या हल्ल्याचा निषेध नोंदवला. सायन येथे भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत रास्तारोको केला. त्यामुळे सायन येथे वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी आंदोलकांनी संपूर्ण राज्यात आंदोलन करण्याचा इशाराही दिला. (bjp agitation in mumbai against attack on JP Nadda convoy in Bengal)

जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाल्याचं वृत्त येताच आज भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी सायन येथे जमून जोरदार निदर्शने केली. हातात भगवे झेंडे आणि खांद्यावर पक्षाचे चिन्हं असलेले शेले घेऊन जमलेल्या या भाजप कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमधी ममता बॅनर्जी सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. यावेळी प्रसाद लाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी ‘ममता बॅनर्जी हाय हाय’, ‘ममता बॅनर्जी मुर्दाबाद’च्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

ठिय्या आंदोलन, रास्तारोको

यावेळी प्रसाद लाड आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच बसून ठिय्या आंदोलन करत घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काही आंदोलकांनी ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारले तर काहींनी ममता बॅनर्जी यांच्या फोटोवर शाई फेकून तीव्र निषेध व्यक्त केला. (bjp agitation in mumbai against attack on JP Nadda convoy in Bengal)

वंदे मातरम, ममता बॅनर्जी हाय हाय

भाजप कार्यकर्त्यांनी रस्तारोको करत ‘ममता बॅनर्जी हाय हाय’, ‘ममता बॅनर्जी मुर्दाबाद’ आणि ‘वंदे मातरम’च्या जबरदस्त घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. अचानक शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर जमल्याने सायन येथे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

हा संविधानावरील हल्ला

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. देशभरातील निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळत असल्याने ममता बॅनर्जी या घाबरल्या आहेत. त्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. नड्डा यांना झेड प्लस सुरक्षा आहे. संविधानाच्या मार्गानेच आम्ही बंगालमध्ये प्रचार करत होतो. तरीही आमच्या नेत्यावर हा हल्ला करण्यात आला असून हा देशाच्या संविधानावरीलच हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया लाड यांनी व्यक्त केली. तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववाद्यांना टार्गेट केलं जात असून पुन्हा असे हल्ले झाले तर आम्ही बॅनर्जी यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. (bjp agitation in mumbai against attack on JP Nadda convoy in Bengal)

संबंधित बातम्या:

PHOTO | नड्डांच्या ताफ्यावर दगडफेक, भाजप टीएमसीचं गुंडाराज संपवून सत्तेत येणार: नड्डा

इंधन दरवाढीचा भडका, शिवसैनिक गॅस सिलिंडर घेऊन रस्त्यावर; मुंबईत जोरदार आंदोलन

पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप

(bjp agitation in mumbai against attack on JP Nadda convoy in Bengal)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.