Ganeshotsav 2020 | कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल : प्रवीण दरेकर

विनायक राऊत यांनी केलेले वक्त्यव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे, असे प्रवीण दरेकर (Pravin Darekar On Konkan Ganeshotsav 2020) म्हणाले.

Ganeshotsav 2020 | कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल : प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Jul 31, 2020 | 4:00 PM

मुंबई : मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्सवासाठी कोकणात यावं, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले होते. या वक्तव्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली. “विनायक राऊतांचे वक्तव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. त्यामुळे कोकणच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याची किंमत आता शिवसेनेला मोजावी लागेल,” असे प्रवीण दरेकर म्हणाले. (Pravin Darekar On Konkan Ganeshotsav 2020)

“कोकणची जनता असेल किंवा मुंबईतला चाकरमानी असेल, कोणतीही तकलादू भूमिका घेणार नाही. मुंबईतील चाकरमानी सुरक्षितपणे आपल्या गावी गेला पाहिजे. तो गावी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची तपासणी असेल. त्यांना क्वारांटाईन करावे लागेल. पण त्याचा चाकरमान्यांना त्रास होणार नाही,” अशी दुहेरी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

“विनायक राऊत यांनी केलेले वक्त्यव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. एका बाजूला भावना आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती आहे. या कोकणच्या जनतेच्या भावनेवर शिवसेना स्वार झाली. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढविली, त्याच चाकरमान्यांच्या भावनेला ते आता पायदळी तुडवत आहेत,” असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

“या वस्तुस्थितीची जाणीव विनायक राऊत करुन देत आहेत, हे फार दुर्दैवी आहे. या सर्वामुळे कोकणच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून त्याची किंमत आता शिवसेनेला मोजावी लागेल,” असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

विनायक राऊत नेमकं काय म्हणाले?

“कोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्वासाठी कोकणात या,” असे आवाहन विनायक राऊत यांनी केलं आहे.

:”कोरोनाच्या परिस्थितीमुळे चाकरमान्यांसाठी एसटी सुरु करण्यास उशीर होत आहे. कोकणात येणाऱ्यांना 14 दिवसाचा क्वारंटाईन पाळावाच लागणार आहे. तसेच चाकरमान्यांबद्दल भावनेच्या भरात निर्णय घेणे योग्य ठरणार नाही,” असेही राऊत म्हणाले. (Pravin Darekar On Konkan Ganeshotsav 2020)

संबंधित बातम्या : 

सुरक्षा रक्षकांसह माथाडी कामगारांना 50 लाखांचे विमा संरक्षण, अत्यावश्यक सेवेत समावेश, अजित पवारांची घोषणा

Gold Rate | अवघ्या 24 तासात सोने दरात मोठी वाढ, प्रतितोळ्याचा दर…

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.