काँग्रेस पाकिस्तानमध्ये निवडणूक लढणार आहे का? संबित पात्रा यांचा शशी थरुर यांना सवाल
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते शशी थरुर आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पाकिस्तानमधील लाहोर लिटरेचर फेस्टिवलमध्ये मोदी सरकारवर भारतीय मुस्लिमांसोबत भेदभाव करण्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी शशी थरुर आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. “आज (18 ऑक्टोबर) सकाळी शशी थरुर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे लाहोरमध्ये काय म्हटलं हे आम्ही ऐकलं. त्यावर विश्वास बसत नाही. त्यांनी लाहोर लिटरेचर फेस्टिवलमध्ये केवळ भारताची चेष्टा केली नाही, तर भारताटं वाईट चित्र उभं केलं,” असा आरोप संबित पात्रा यांनी केला (BJP leader Sambit Patra criticize Shashi Tharoor for statements in lahore literary festival).
संबित पात्रा म्हणाले, “सरकार भारतातील मुस्लिमांविरोधात कट्टरतावाद आणि पक्षपातीपणे वागत आहे, असं राहुल गांधी यांचे मित्र शशी थरूर कसे म्हणाले? विशेष म्हणजे पाकिस्तानमधील हिंदू आणि शिखांसोबत तेथे काय होतंय? काँग्रेसला पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवायची आहे का? राहुल गांधींना पाकिस्तानमध्ये क्रेडिट हवं आहे का?”
‘तब्लिगी जमातवरुन कोणता पक्षपात?’
“सरकार तब्लिगी जमातवरुन पक्षपात करत आहे आणि मुस्लिमांविरोधात कट्टरतावादाने वागत आहे असं भारताचा खासदार कसं बोलू शकतो. शशी थरूर हे वक्तव्य पाकिस्तानमध्ये बोलत आहेत,” असंही संबित पात्रा म्हणाले.
’80 कोटी नागरिकांना अन्न-धान्य पोहचवण्याचं काम’
यावेळी संबित पात्रा यांनी सरकारने काय काम केलं याचीही माहिती दिली. ते म्हणाले, “कोव्हिडचा सामना करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला कसं सुरक्षित ठेवलं हे जगाने पाहिलं आहे. वेळेवर लॉकडाऊन लागू करण्यात आला, 80 कोटी नागरिकांना अन्न-धान्य पोहचवण्याचं काम केलं. हे काम अगदी छठ पूजेपर्यंत सुरु राहिल.’
संबंधित बातम्या :
इंग्रज नसते, तर भारतावर आज मराठ्यांचं राज्य आणि छत्रपतींचं सुशासन असतं : शशी थरुर
शशी थरुर यांचा सरकारवर हल्लाबोल, सरकारचे अनेक दावे खोडले
BJP leader Sambit Patra criticize Shashi Tharoor for statements in lahore literary festival