BJP Protest for Electricity Bill Relief | वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी वीजबिल होळी आंदोलन

राज्यभरात भाजपकडून वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. (BJP Protest for Electricity Bill Relief Live Update)

BJP Protest for Electricity Bill Relief | वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी वीजबिल होळी आंदोलन
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 12:23 PM

मुंबई : वाढीव वीज बिलाविरोधात राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज आंदोलन करण्यात येत आहे. राज्यभरात भाजपकडून वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन सुरु आहे. राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत वीजबिलाची होळी करत हे आंदोलन करण्यात येत आहे. (BJP Protest for Electricity Bill Relief Live Update)

राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी आज (23 नोव्हेंबर) भाजपतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले होते.

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार सहभागी होणार आहे. यांच्यासह इतरही नेते या आंदोनलात सहभागी झाले आहेत.

? LIVE UPDATE ?

[svt-event title=”वाढीव वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक, पुण्यात पॉवर हाऊस कार्यालयाबाहेर आंदोलन” date=”23/11/2020,12:21PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वाढीव वीजबिल माफ करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू; जगदीश मुळीकांचा सरकारला इशारा” date=”23/11/2020,12:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”  जर वीजबिल माफ केले नाहीत, तर येत्या निवडणुकांमध्ये मतदार माफ करणार नाहीत : कालिदास ” date=”23/11/2020,11:57AM” class=”svt-cd-green” ] वडाळा वाढीव वीजबिलाबाबत आमदार कालिदास कोळंबकर आक्रमक, ऑफिसबाहेर वीजबिलाची होळी पेटवली, 100 हून अधिक कार्यकर्त्यांकडून वीजबिलाची होळी, जर वीजबिल माफ केले नाहीत, तर येत्या निवडणुकांमध्ये मतदार माफ करणार नाहीत, अशी टीकाही कोळंबकरांनी केली. [/svt-event]

[svt-event title=”पुणे भाजपच्या वतीने वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन” date=”23/11/2020,11:48AM” class=”svt-cd-green” ] पुणे शहर भाजपच्या वतीने वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन, सोमवार पेठेतील पॉवर हाऊस कार्यालयाबाहेर आंदोलन, सरकारचा निषेध करत वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात भाजपकडून वीजबिल होळी आंदोलनाला सुरुवात” date=”23/11/2020,8:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपचं आंदोलन” date=”23/11/2020,7:57AM” class=”svt-cd-green” ] वीजबिल माफीसाठी विदर्भात भाजप आक्रमक, विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात भाजप वीज बिलाची होळी करणार, नागपुरात भाजप सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात आंदोलन, नागपुरातील कामठी मतदारसंघात सकाळी 9 वाजता वीज बिलाची होळी करणार, नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपचं आंदोलन [/svt-event]

[svt-event title=”भाजपतर्फे चाळीसगाव येथे वीजबिल होळी आंदोलन” date=”23/11/2020,7:53AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

(BJP Protest for Electricity Bill Relief Live Update)

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले आली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारच्या ऊर्जामत्र्यांनीच स्वतः वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही आणि नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. दुसरीकडे महावितरण सक्तीने वीजबिले वसूल करण्याच्या प्रयत्नात आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भाजपा राज्यात सर्वत्र वीजबिलांच्या होळीचे आंदोलन करणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते, त्यामुळे नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे हातावर पोट असणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक इत्यादींना स्वतःहून पॅकेज द्यायला हवे होते. या सरकारने अजूनही जनतेला कोणत्याही प्रकारचे पॅकेज दिलेले नाही. उलट वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे भरमसाठ वीजबिले आली आहेत. त्याबाबत रास्त सवलत देण्यासही सरकार तयार नाही. त्यामुळे भाजपाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सोमवारी वीजबिलांची होळी करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील. जनतेने या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले होते.  (BJP Protest for Electricity Bill Relief Live Update)

संबंधित बातम्या : 

वीजबिल माफीसाठी भाजपचे सोमवारी वीजबिल होळी आंदोलन

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.