भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा रुग्णालयात, कोरोनाची लक्षणे दिसल्याने उपचार
भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी प्रवक्ते संबित पात्रा ओळखले जातात. (BJP spokesperson Sambit Patra hospitalised after Corona symptoms)
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘कोरोना’ विषाणूची लक्षणे आढळल्याने संबित पात्रा यांना गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. (BJP spokesperson Sambit Patra hospitalised after Corona symptoms)
संबित पात्रा हा भाजपचा राष्ट्रीय स्तरावरील चेहरा आहे. भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. बर्याचदा ते टीव्हीवर चर्चासत्रांमध्ये सहभागी होताना दिसतात.
45 वर्षीय संबित पात्रा हे हिंदूराव रुग्णालयात माजी वैद्यकीय अधिकारी आहेत. ते ओएनजीसीच्या मंडळावरील माजी संचालकांपैकी एक आहेत. 2012 मध्ये दिल्लीच्या काश्मिरी गेट विभागातून त्यांनी भाजपच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली, त्यात पात्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले, मात्र त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत पूर्णवेळ राजकारणात झोकून देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : किमान 12 तास रस्तेमार्गे प्रवास, अशोक चव्हाणांवर मुंबईत कोरोनावर उपचार!
2014 मधील लोकसभा निवडणूकीच्या वेळी पात्रा यांनी भाजपसाठी प्रचार केला. टीव्हीवरील चर्चांमधून त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. भाजपची सत्ता आल्यावर पात्रा हे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत पात्रा यांनी ओदिशातील पुरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांना 11,700 मतांनी पराभूत केले.
माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि भाजप नेते तेजिंदर पालसिंग बग्गा यांनी संबित पात्रा यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणारे ट्वीट केले आहेत. यामध्ये #DefeatCorona असा हॅशटॅग त्यांनी वापरला आहे. (BJP spokesperson Sambit Patra hospitalised after Corona symptoms)
Get well soon #Sambitpatra ji. #DefeatCorona @sambitswaraj
— Dr. Subhash Bhamre (@DrSubhashMoS) May 28, 2020
Get well soon @sambitswaraj Bhai. #DefeatCorona
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) May 28, 2020
(BJP spokesperson Sambit Patra hospitalised after Corona symptoms)