Happy birthday Boman Irani | वेफरचे दुकान ते तिकीट बारीपर्यंतचा प्रवास, वाचा बोमन ईराणींची ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’
वयाच्या 42व्या वर्षी व्यावसायिक चित्रपटांमध्ये पदार्पण केले. याआधी त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये वेटर आणि स्टाफ म्हणून 2 वर्षे काम केले होते.
मुंबई : आपल्या अनोख्या अभिनय शैलीने अवघ्या मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते बोमन ईराणी (Bollywood Actor Boman Irani) आज (2 डिसेंबर) आपला 61वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी विनोदी, गंभीर, नायक, खलनायक अशा सगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. 2 डिसेंबर 1959 रोजी मुंबईत बोमन ईराणी यांचा जन्म झाला. बोमन यांची चित्रपट कारकीर्द तशी सगळ्यांच्याच माहितीची आहे. परंतु, त्याची ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’देखील एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे (Bollywood Actor Boman Irani Celebrating his 61th birthday).
एका मुलाखतीदरम्यान बोमन ईराणी यांनी आपल्या या प्रेमकथेबाबत सांगितले होते. पहिल्यांदा पाहताच क्षणी पत्नी जेनोबियाच्या प्रेमात पडलो होतो, असे बोमन ईराणी म्हणतात. मनोरंजन विश्वाच्या झगमगाटी विश्वात पाऊल टाकण्यापूर्वी बोमन ईराणी यांचे एक वेफर्सचे दुकान होते.
पहिल्याच भेटीत प्रेम…
या वेफर्सच्या दुकानावरच त्यांची जेनोबिया यांच्याशी पहिली भेट झाली होती. दुकानावर असतानाच काहीतरी विकत घेण्यासाठी आलेल्या जेनोबिया यांच्याशी बोमन यांची नजरानजर झाली. त्यानंतर दोघांमध्ये काहीवेळ जुजबी संवाद देखील झाला. पहिल्याच भेटीतच दोघांची छान मैत्री झाली. या दिवसानंतर जेनोबिया रोज त्यांच्या दुकानावर येत राहिल्या. याबद्दल सांगताना बोमन म्हणतात, ‘मला माहित होते की तिलाही मी आवडतो. नाहीतर रोज ईतके वेफर्स कोण खातं?’
Was indeed watching movies from my mother’s womb. Thank you Creative Indians for a wonderful episode. The Creative Indians Season 4, all episodes superb. Now Streaming on Netflix! Superb production amazingly shot only on iPhone! pic.twitter.com/2wERnMx1sc
— Boman Irani (@bomanirani) September 4, 2020
(Bollywood Actor Boman Irani Celebrating his 61th birthday)
काऊंटरवरची ही मैत्री हळूहळू फोन कॉलपर्यंत पोहोचली. जेनोबिया यांची शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू झाली तेव्हा, अक्षरशः जेनोबियाच्या वडिलांनी बोमन यांना फोन केला. ते म्हणाले, ‘राग मानू नकोस, पण निदान एक महिनाभर तरी तिला फोन करू नको. तिचा अभ्यास होत नाही.’ मनावर दगड ठेवून बोमन यांनी या गोष्टीला होकार दर्शवला. मात्र, परीक्षा संपताच ते दोघे पहिल्यावहिल्या ‘डेट’वर गेले (Bollywood Actor Boman Irani Celebrating his 61th birthday).
लग्नाबद्दल विचारणा…
बोमन यांनी पहिल्याच डेटदरम्यान जेनोबिया यांना लग्नाबद्दल विचारणा केली होती. डेटदरम्यान जेवण येण्याआधीच बोमन यांनी जेनोबिया यांना, ‘मला वाटते की आपण लग्न केले पाहिजे’, असे म्हणत थेट प्रपोज केला. ते म्हणतात, आजच्या पिढीला हे खूप बालिश वाटेल, पण मला माहित होतं की आयुष्यभर साथ निभावणारी हीच व्यक्ती असणार आहे. तर, कुठलेही किंतु-परंतु न करता जेनोबिया यांनीदेखील त्यांना होकार दिला.
यानंतर दोघांनी लग्न केले. मात्र, आजही या गोष्टी आठवून ते दोघेही खूप हसतात. बोमन आणि जोनोबिया यांना दोन अपत्ये असून, त्यांची देखील लग्न आली आहेत. वयाच्या 42व्या वर्षी व्यावसायिक चित्रपटांमध्ये पदार्पण केले. याआधी त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये वेटर आणि स्टाफ म्हणून 2 वर्षे काम केले होते.
(Bollywood Actor Boman Irani Celebrating his 61th birthday)