VIDEO : राखी सावंत पतीसह बिग बॉसमध्ये झळकणार
बिग बॉसमध्ये बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant in bigg boss 13) भाग घेणार आहे.
मुंबई : हिंदी बिग बॉसचा 13 (Bigg Boss 13) वा सिझन लवकरच सुरु होणार आहे. यंदाच्या बिग बॉसच्या शूटिंगचे ठिकाण, थीम, वेळ, संकल्पना सर्व काही बदलण्यात आले आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा बिग बॉस हा अत्यंत रंजक असेल असे बोललं जात आहे. बिग बॉस 13 च्या (bigg boss 13) घरात कोणकोणते सेलिब्रिटी असणार याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. यंदाच्या बिग बॉसमध्ये बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant in bigg boss 13) भाग घेणार आहे. विशेष म्हणजे राखी एकटी नव्हे तर तिच्यासोबत तिचा पतीही बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे.
नुकतंच राखीने (Rakhi Sawant in bigg boss 13) इंस्टाग्रामवर बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याचा एक व्हिडीओ तयार केला आहे. मित्रांनो, मी लवकरच बिग बॉसच्या 13 व्या (bigg boss 13) सीझनमध्ये येणार आहे. यात तुम्हाला माझ्यासोबत माझ्या पतीची झलक पाहायला मिळेल. “मला माहीत आहे, किती तरी लोक माझ्या पतीची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पण तुम्हाला त्यांची झलक बिग बॉसमध्ये पाहायला मिळेल,” असा प्रकारचा एक व्हिडीओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
विशेष म्हणजे या व्हिडीओ मी स्वत: माझ्या पतीला बघण्यासाठी उत्सुक आहे. तो माझ्यासाठी चांद का तुकडा आहे, कधी कधी तो दिसतो असेही राखीने म्हटलं आहे. बायको मुंबईमध्ये आहे आणि हा स्वत: यूकेमध्ये जाऊन बसला आहे, याला लग्न म्हणतात का? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे.
“तुम्ही माझे चाहते आहात ना, तर जरा माझ्या पतीला ओरडा, मलाही यूकेमध्ये घेऊन जा असे सांगा. पण त्यापूर्वी त्याला बिग बॉसमध्ये यायला सांगा”, अशी विनंती राखीने चाहत्यांना केली आहे.
नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असणारी राखीचे नुकतंच ‘छप्पन छुरी’ नावाचे एक गाणे रिलीज झाले आहे. सध्या ती त्याच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राखीने रितेश नावाच्या एका NRI सोबत लग्न केले होतं. लग्नानंतर तिने स्वत:चे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. मात्र यातील एका फोटोत तिचा नवरा तिच्यासोबत दिसला नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांना रितेशला बघण्याची फार इच्छा आहे.