गाडी ओव्हरटेकवरुन वाद, शिर्डीत तरुणाच्या हत्येने खळबळ
गाडी ओव्हरटेक करण्यावरुन वाद झाल्याने एका 35 वर्षीय तरुणाची हत्या (murder due to car overtake) झाली आहे.

अहमदनगर : गाडी ओव्हरटेक करण्यावरुन वाद झाल्याने एका 35 वर्षीय तरुणाची हत्या (murder due to car overtake) झाली आहे. ही धक्कादायक घटना शिर्डी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विठ्ठल मोरे असं हत्या झालेल्या तरुणाचं (murder due to car overtake) नाव आहे.
मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास शिर्डी शहरातील पिंपळवाडी रस्त्यावर आरोपी आणि मयतामध्ये गाडी ओव्हरटेक करण्यावरुन वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की आरोपीने थेट तरुणाची हत्या केली.
या प्रकरणानंतर मयत विठ्ठलच्या मामे भावाच्या तक्रारीवरुन आरोपी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक चौकशी सुरु आहे.