ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तूंची होळी, तर आधी हातातील मोबाईल, घरातील सामान जाळा, संभाजी ब्रिगेडचा खोचक सल्ला

ब्राह्मण महासंघाने आज (8 जून) पुण्यातील सावरकर स्मारक या ठिकाणी चिनी वस्तूंची होळी करुन चीनचा निषेध केला. तसेच चीनने कोरोनाचा प्रसार जाणूनबूजून केल्याचा आरोप केला (Brahman Mahasangh protest against China goods in Pune).

ब्राह्मण महासंघाकडून चिनी वस्तूंची होळी, तर आधी हातातील मोबाईल, घरातील सामान जाळा, संभाजी ब्रिगेडचा खोचक सल्ला
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 4:19 PM

पुणे : ब्राह्मण महासंघाने आज (8 जून) पुण्यातील सावरकर स्मारक या ठिकाणी चिनी वस्तूंची होळी करुन चीनचा निषेध केला. तसेच चीनने कोरोनाचा प्रसार जाणूनबूजून केल्याचा आरोप केला (Brahman Mahasangh protest against China goods in Pune). यावर प्रतिक्रिया देताना संभाजी ब्रिगेडने हा महासंघाचा स्टंट असल्याची टीका केली. तसेच ब्राह्मण महासंघाने आधी हातातील चीनचे मोबाईल आणि घरातील सामान जाळावं, असा खोचक सल्ला दिला. यामुळे पुण्यात चीनच्या वस्तूंचा बहिष्कार टाकण्यावरुन दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं.

ब्राह्मण महासंघाने सावरकर स्मारक या ठिकाणी चिनी विदेशी वस्तूंची होळी करत वस्तू फोडून चीनचा निषेध केला. चीनने कोरोनाचा प्रसार जाणूनबूजून केला असल्याचा आरोपही ब्राह्मण महासंघाने केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याच ठिकाणी विदेशी वस्तूंची होळी केली होती. ब्राह्मण महासंघाने चीनी वस्तूंच्या वापरावर बंदी घालणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेक चिनी वस्तूंची तोडफोड करण्यात आली.

ब्राह्मण महासंघाने चिनी वस्तूंची तोडफोड करत केलेल्या आंदोलनावर संभाजी ब्रिगेडने सडकून टीका केली आहे. ब्राह्मण महासंघाचे हे आंदोलन केवळ स्टंट असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. जर ब्राह्मण महासंघाला खरोखर चिनी वस्तूंच्या विरोधात आंदोलन करायचे असेल, तर त्यांनी आधी आपल्या हातातील चिनी मोबाईल, चिनी अॅप, घरातील पुजेचं चिनी साहित्य, घरातील टिव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जाळावे, असा खोचक सल्ला संभाजी ब्रिगेडने दिला. तसेच सध्या कोरोना निदानासाठी वापरण्यात येणारे इन्फ्रा रे तापमापक, केंद्राने मागवलेल्या पीपीई किट या देखील चिनी असल्याचंही सांगत संभाजी ब्रिगेडला टोला लगावला.

संभाजी ब्रिगेडने आपल्या भूमिकेत म्हटले आहे, “ब्राह्मण महासंघाने लोकांची दिशाभूल करु नये. चीनशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. कारण सगळ्यांना कमी किमतीत वस्तू खरेदी करायची सवय लागली आहे. चीन तुमच्या घरात घुसलेला आहे. तुमच्या घरातील सर्व वस्तू तपासा, त्या चीनच्या निघतील. केंद्र सरकारने सर्वप्रथम चीन सोबतचे सर्व व्यवहार बंद करावेत. भारतीय सैनिकांचे बुलेट-प्रुफ जॅकेट, चिनी अॅप, वस्तू आणि व्यवहार सर्वप्रथम बंद करावा. पण सरकार असं करणार नाही.”

हेही वाचा :

लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका

विधान परिषद निवडणूक : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी काँग्रेसची फिल्डिंग?

शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज, उद्यापासून दौरा

चार दिवसात अंदाजे 20 हजार प्रवासी मुंबई-पुण्यात परतले, परप्रांतिय मजूर परतण्यास सुरुवात?

Brahman Mahasangh protest against China goods in Pune

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.