Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्कम टॅक्स भरायची डोकेदुखी?, काळजी करु नका, SBI अशी करेल तुमची मदत!

आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत रिटर्न न भरणा्यांना दंड भरावा लागू शकतो.

इन्कम टॅक्स भरायची डोकेदुखी?, काळजी करु नका, SBI अशी करेल तुमची मदत!
Follow us
| Updated on: Dec 27, 2020 | 11:34 AM

मुंबई : आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत रिटर्न न भरणा्यांना दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. एसबीआयने (SBI) प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, YONO अॅपद्वारे कोणत्याही अडचणीशिवाय टॅक्‍स भरू शकता. (can pay taxes without any hassle through SBI’s Yono app)

कोरोना व्हायरलमुळे इन्कम टॅक्‍स रिटर्न अंतिम मुदत 31 जुलै ते 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली होती. नंतर ती 30 नोव्हेंबर आणि नंतर 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देताना एसबीआयने सांगितले आहे की, जर आयकर भरण्यास काही अडचण येत असेल तर ते YONO अ‍ॅपची मदत तुम्ही घेऊ शकता, यासाठी तुम्हाला YONO अ‍ॅपवर लॉग इन करावे लागेल.

यानंतर आपल्याला शॉप आणि ऑडर्समध्ये जावे लागेल. मग टॅक्स आणि इन्वेस्टमेंटमध्ये जावे लागेल त्यानंतर पुढे येईल की, Tax2Win तिथे मग आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्हाला हे सर्व करताना काही समस्या येत असेल तर तुम्ही या हेल्पलाइन क्रमांकावर 9660-99-66-55 कॉल करून माहिती मिळवू शकता.

 संपूर्ण प्रक्रिया आपल्याला www.incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल. यानंतर यूजर आयडी (पॅन), संकेतशब्द, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर ‘ई-फाईल’ (e-File) टॅबवर जा आणि या लिंक Income Tax Return क्लिक करा. प्रथम आपल्याला कोणता आयटीआर (ITR) भरायचा ते निवडावे लागेल. मूळ रिटर्न भरत असल्यास ‘Original’ टॅबवर क्लिक करा. सुधारित रिटर्न भरत असल्यास ‘Revised Return’ क्लिक करा.

यानंतर, Prepare and Submit Online ओपन करा आणि Continue वर क्लिक करा आणि तिथे विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि ते सर्व सेव्ह करा जर हे सर्व करत असताना त्याची वेळ संपली तर ती सर्व माहिती तुम्हाला परत भरावी लागेल यासाठी माहिती भरत असतानाच सेव्ह करत राहा.

यामध्ये तुम्हाला गुंतवणूकीची सर्व माहिती, आरोग्य आणि जीवन विम्याची माहिती भरावी लागेल. सर्व माहिती भरल्यानंतर, शेवटी Verification चे पेज येईल. तुम्हाला शक्य असेल तर लगेच वेरिफाय करा किंवा 120 दिवसांच्या आत तुम्ही केव्हाही वेरिफाय करून घेऊ शकता. त्यानंतर, Previw and submit जाऊन सबमिट करा.

वेरिफिकेशन करायला विसरू नका आयटीआर (ITR) अपलोड झाल्यानंतर 120 दिवसांच्या आत वेरिफाय करणे जाणे आहे. (I) आधार ओटीपीद्वारे (II) नेट बँकिंगद्वारे ई-फाईल खात्यात लॉग इन करून (IV) आयटीआर-व्ही ची स्वाक्षरी केलेली प्रत बेंगळुरूला पाठवा.

संबंधित बातम्या : 

1 जानेवारीपासून GST चा नियम बदलणार, 45000 व्यापाऱ्यांवर होणार परिणाम

(can pay taxes without any hassle through SBI’s Yono app)

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.