बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची लग्नात हजेरी, बीड ते हैदराबाद प्रवास, 49 जणांवर गुन्हा दाखल

देशभरात कोरोनाने थैमान घातलं असताना नागरिकांमध्ये (Case file against corona patients) अजूनही परिस्थितीचं गांभीर्य दिसत नाही.

बीडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची लग्नात हजेरी, बीड ते हैदराबाद प्रवास, 49 जणांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 1:57 PM

बीड : देशभरात कोरोनाने थैमान घातलं असताना नागरिकांमध्ये (Case file against corona patients) अजूनही परिस्थितीचं गांभीर्य दिसत नाही. बीडमध्ये एकाच कुटुंबातील चार कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडून शहरात मोकाट फिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात चार कोरोनाबाधित रुग्णांसह 49 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Case file against corona patients).

कोरोनाबाधित रुग्ण शहरात शॉपिंग करत हिंडले. याशिवाय एका विवाह समारंभालादेखील त्यांनी उपस्थिती लावल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. याशिवाय अनेक जण क्वारंटाईनमध्ये असताना घराबाहेर फिरले.

शहरभर फिरलेले चार कोरोनाबाधित रुग्ण हे बीड शहरातील मसरतनगरचे रहिवासी आहेत. प्रशासनाने त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाचे आदेश जुगारत हे रुग्ण शहरभर फिरले. विशेष म्हणजे त्यांनी बीड ते हैदराबाद असा प्रवास केला. त्यानंतर त्यांनी शॉपिंग केली.

याशिवाय बीड शहरात एका मशिदीत लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या लग्नातदेखील या चार कोरोनाबाधितांनी हजेरी लावली. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी चार कोरोनाबाधितांसह 49 जणांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोरोना लढ्यासाठी बीडचा प्लॅन “बी” तयार, 1365 रुग्णांवर उपचार करणारं भव्य कोरोना सेंटर सज्ज

दरम्यान, कोरोना रुग्णांची दिवसेंदवस संख्या वाढत असल्याने बीड जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून प्लॅन “बी” तयार केला आहे (Beed Corona plan for prevent infection). यानुसार कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर सहज उपचार होईल. यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आरोग्य विभागाने 1 हजार 365 बेडचे कोरोना सेंटर तयार केले आहे. यात स्वतंत्र बंदिस्त कक्ष, प्रत्येक कक्षात ऑक्सिजन पाईप, व्हेंटिलेटर, स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यात आली आहे. केवळ महिनाभराच्या काळात हे कोरोना सेंटर उभं करण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 87 वर पोहचला आहे. यापैकी आतापर्यंत 64 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 21 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बीडच्या मसरत नगरमध्ये रुग्ण आढळल्यामुळे मसरत नगर परिसर सील करण्यात आली आहे. परळीतील रेशन दुकानदाराला कोरोनाची लागण झाल्यानंतरही परळी शहरातील 3 कॉलनी सील करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.