AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adani group: अंबुजा आणि एसीसी या सिमेंट कंपन्या आता अदानी टेकओव्हर करणार, 10.5अब्ज डॉलर्सचा सौदा, सिमेंट क्षेत्रातही मोठी झेप

या कंपनीचे टेकओव्हर केल्याचे गौतम अदानी यांनी ट्विटवरुन जाहीर केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारताच्या कहाणीवर आमचा ठाम विश्वास आहे. होलसीमच्या सिमेंट मालमत्तेला आमच्या ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिकशी जोडल्याने आम्ही भारतातील सिमेंटच्या जगातील सर्वात ग्रीनेस्ट सिमेंट कंपनी झालो आहोत.

Adani group: अंबुजा आणि एसीसी या सिमेंट कंपन्या आता अदानी टेकओव्हर करणार, 10.5अब्ज डॉलर्सचा सौदा, सिमेंट क्षेत्रातही मोठी झेप
Gautam Adani takeover ambujaImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 10:42 PM

मुंबई – अदानी ग्रुप (Adani Group)आता सिमेंटच्या क्षेत्रातही उतरली आहे. अंबुजा आणि एसीसी (Ambuja and ACC cement)या सिमेंट क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्या अदानी टेकओव्हर करत आहेत. हा व्यवहार १०.५ अब्ज डॉलर्सचा आहे. अदानी ग्रुपचे चेयरमन गौतम अदानी (Gautam Adani)हा व्यवहार करण्यासाठी गेल्या आठवड्यात अबुधाबी आणि लंडनला गेले होते. आता ते भारतात परतले आहेत. एसीसी म्हणजे एसोसिएटेड सिमेंट कंपनीवर मालकी हक्क हा होलसीम कंपनीचा आहे, ही स्वित्झर्लंडची बिल्डिंग मटेरियलची कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात १ ऑगस्ट १९३६ साली मुंबईत झाली होती. काही ग्रुप्सने एकत्र येऊन या कंपनीची सुरुवात केली होती. या कंपनीचे टेकओव्हर केल्याचे गौतम अदानी यांनी ट्विटवरुन जाहीर केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, भारताच्या कहाणीवर आमचा ठाम विश्वास आहे. होलसीमच्या सिमेंट मालमत्तेला आमच्या ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिकशी जोडल्याने आम्ही भारतातील सिमेंटच्या जगातील सर्वात ग्रीनेस्ट सिमेंट कंपनी झालो आहोत.

१७ वर्षांचा कारभार आटोपणार होलसीम

होलसीम कंपनीने भारतात १७ वर्षांपूर्वी व्यवसाय सुरु केला होता. ती जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी मानली जाते. या करारानंतर आता कंपनी भारतातील त्यांचा व्यवसाय बंद करणार आहे. होलसीम कंपनीच्या देशआतील दोन कंपन्यांची अंबुजा आणि एसीसी कंपन्यांत भागिदारी आहे. ७३,१२८ कोटींच्या अंबुजा कंपनीत होलसिमची ६३.१ टक्के भागिदारी आहे.

अंबुजात एसीसीचा ५० टक्के वाटा

एसीसी कंपनीत अंबुजाचा ५० टक्क्यांचा वाटा आहे. तर होलसीमचा ४.४८ टक्के वाटा आहे. होलसीमचा भारतातील व्यवसाय खरेदी करणाऱ्याला एसीसीच्या २६ टक्क्यांसाठी ओपन ऑफऱ आणायची होती. ही ऑफऱ १०,८०० कोटी म्हणजेच १.४२ अब्ज डॉलर्सची होती. अंबुजा सिमेंटची क्षमता ३.१ कोटी मीट्रिक टन इतकी आहे. तर अंबुजा आणि एसीसी मिळून त्यांची क्षमता ६.४ कोटी मीट्रिक टन इतकी आहे.

अदानींचा विस्तार

१९८८ साली कमोडिटी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून सुरु झालेल्या अदानी समुहाचा विस्तार चकित करणारा आहे. बंदरांच्या व्यवसायात उतरल्यानंतर ते राष्ट्रीय पातळीवर आले आहेत. गेल्या काही वर्षांत या समुहाने ग्रीन एनर्जी, मीडिया, ऑईड अँड गॅस, मायनिंग, एयरपोर्ट ऑपरेशन्स, कंन्स्ट्रक्शन, फूड प्रोसेसिंगमध्ये आपला ठसा उमटवला आहे. अदानी गेल्या वर्षी अदानी सिमेंटच्या नावाने सिमेंट क्षेत्रात आले होते. एसीसीच्या टेक ओव्हरमुळे ते या क्षेत्रातील मोठे प्लेयर झाले आहेत.

१९८३ साली झाली होती अंबुजा सिमेंटची स्थापना

अंबुजा सिमेंटची स्थापना १९८३ साली झाली होती. अंबुजा सिमेंटचा दर्जा हा चांगला मानण्यात येतो.

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.