राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाही, मनसे-भाजप युतीवर चंद्रकांतदादांचं मोठं विधान

महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारमधील कुरबुरीनंतर नव्या राजकीय गणितांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कधी भाजप-शिवसेना तर कधी भाजप मनसे युतीची चर्चा होतेय. यावर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडलीय.

राज ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाही, मनसे-भाजप युतीवर चंद्रकांतदादांचं मोठं विधान
राज ठाकरे, चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 11:42 PM

नाशिक : महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारमधील कुरबुरीनंतर नव्या राजकीय गणितांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कधी भाजप-शिवसेना तर कधी भाजप मनसे युतीची चर्चा होतेय. यावर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडलीय. चंद्रकांत पाटील म्हणाले, “मनसे परप्रांतियांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत हे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जिवावर सत्ता येणार नाही. आमचा खूप जुना परिचय आहे. योग आला, तर त्यांना भेटेल. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत.”

“शिवसेने बरोबर आम्ही सत्तेत नाही, पण त्यांच्यासोबत आमचं वैर नाही. आम्ही लोकहिताचे आंदोलन करतो. तुम्ही एकत्र निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळं सरकार चालतं, वेगळ्या विचाराचं सरकार चालतं. परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलत असतात. ते भाजपबरोबर येतील असं वाटत नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी महापालिकेच्या निवडणूका फार दूर आहेत, असं म्हणत कोविडमुळे फिजिकल बैठका दूर झाल्या होत्या, असं मत व्यक्त केलं.

“भाजप मविआतील कुठल्याही एका पक्षाच्या विरोधात नाही”

चंद्रकांत पाटील यांनी सध्या ईडीकडून होणाऱ्या कारवायांच्या मुद्द्यावरही मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “ईडी ही एक केंद्राची स्वायत्त संस्था आहे. मी त्याच्याबद्दल टिप्पणी करणार नाही. चौकशांना घाबरण्याचं कारण नाही. राष्ट्रवादीच्या बाबतीतचं नाही, तर आम्ही अन्यायच्या विरोधात आक्रमक आहोत. राठोड प्रकरण, कारखान्यांच्या घोटाळ्यात आम्ही आक्रमक आहोत. मविआतील कुठल्याही एका पक्षाच्या विरोधात नाही. आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही कारखान्यांना निधी दिला. साखरेला उठाव नाही. पंकजा मुंडे नाराज नाही. त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. आक्रोश वाटणं योग्य आहे, मात्र आता तो आक्रोश शांत झालाय,” असंही त्यांना नमूद केलं.

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही : चंद्रकांत पाटील

दोन वर्षात म्हातारी मुलीला भेटली नाही, मुलगी म्हातारीला भेटायला आली नाही, लॉकडाऊनचं काय ते एकदाचं ठरवा: पाटील

अजित पवार आणि अनिल परबांवर गुन्हा दाखल करुन CBI चौकशी करा, हायकोर्टात याचिका

Chandrakant Patil comment on BJP MNS alliance in upcoming days

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.