‘बारामती पॅटर्न’वर चंद्रकांत पाटील फिदा, पुण्यातही बारामती पॅटर्न राबवण्याची आयुक्तांकडे मागणी

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी बारामती पॅटर्न राबवता येईल का, याबाबत चंद्रकांत पाटलांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली.

'बारामती पॅटर्न'वर चंद्रकांत पाटील फिदा, पुण्यातही बारामती पॅटर्न राबवण्याची आयुक्तांकडे मागणी
Follow us
| Updated on: Apr 22, 2020 | 4:21 PM

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलहे कोरोना रोखण्यासाठी वापरण्यात आलेल्या  ‘बारामती पॅटर्न’वर (Chandrakant Patil On Pune Corona) फिदा असल्याचं दिसतंय. कारण पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी बारामती पॅटर्न राबवता येईल का, याबाबत चंद्रकांत पाटलांनी मनपा आयुक्तांशी चर्चा केली. पुण्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलिसांबरोबर निवृत्त सैनिक आणि निवृत्त पोलीस तैनात करता येतील का, याबाबतही (Chandrakant Patil On Pune Corona) चर्चा केली.

सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत आहे. सध्या पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या ही 665 वर पोहोचली आहे. तर 53 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल, त्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी आज चंद्रकांत पाटलांनी मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्तांची भेट घेतली. कोरोना संदर्भातील योजनेला उपाययोजनांचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी पोलिसांबरोबर निवृत्त लष्कर जवान आणि पोलिसांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा विचार मांडला. तसंच पोलिसांनी आर्थिक चिंता न करता राजकीय आणि सामाजिक संस्था मदत करतील. मी शंभर जणांचा पगार देईन, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी चार प्रभागात बारामती, भिलवडा पॅटर्न राबवता येईल का? याबाबतही त्यांनी चर्चा केली. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या दहा दिवसाचा पॅक घरोघरी द्यावा. या कामासाठी पक्ष आणि नावाचा आग्रह न धरता आम्ही सहभागी होऊ, असंही चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil On Pune Corona) यावेळी म्हटलं.

अनेकांची घरं आठ बाय दहाची, सोशल डिस्टन्सिंग पाळणे अवघड : चंद्रकांत पाटील

अनेक नागरिकांची घरं ही आठ बाय दहाच्या आकाराची आहेत. या घरांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे अवघड आहे. त्यामुळे जवळच्या शाळा, मंगल कार्यालय, लॉजेस, हॉटेलमध्ये त्यांना शिफ्ट करण्यात यावं, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.

जर हे शक्य नसेल, तर 60 वर्षांवरील व्यक्तींना लॉजमध्ये शिफ्ट करावं. या संदर्भातही आवश्यक ती आर्थिक पातळीवर मदत करण्याची भूमिका चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली.

मुंबई आणि पुण्यामध्ये जास्त ताण किंवा एक्स्ट्रा लोड आहे. आता पेशंट वाढू लागल्याने ढिलाई सुरु झाली आहे. प्रशासनाने याचा पर्यायी विचार करावा, अन्यथा कंट्रोलमध्ये आलेलं संकट दोन शहरांत वाढेल, अशी भीती चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली. या दोन शहरात आणखी काळजी घ्यावी. लक्षणं दिसली नाही तरी सर्वांची तपासणी करावी. नाहीतर समस्या वाढून ढिलाई मारक ठरेल, असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला.

परप्रांतीय नागरिकांना ट्रेन ऐवजी बसने पाठवा : चंद्रकांत पाटील

राज्यातील परप्रांतीय नागरिकांना ट्रेन ऐवजी बसने त्यांच्या राज्यात सोडणे गरजेचे आहे. बसमध्ये सोशल डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी एका सीटवर एका नागरिकांना बसवावं, आरोग्य तपासणी करावी आणि नाश्त्याची सोय करुन त्यांची रवानगी करावी‌‌. यासाठी तीन ते चार दिवस लागले, तरी चालेल असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेतील नियुक्तीवरुन चंद्रकांत पाटलांचा पलटवार

उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेतील नियुक्तीवरुन आघाडीवरच पलटवार केला. 28 मे पर्यंत उद्धव ठाकरेंना धोका नव्हता‌. मग एवढी घाई का करण्यात आली, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला. कोरोना भडकलेला असताना त्यांच्याकडे एकच विषय होता का, उद्धव ठाकरे यांना अनुपस्थित ठेवून अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेला निर्णय अवैध आहे. आम्ही नाही, तर तुम्हीच राजकारण करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला.

घटनेनुसार, उद्धव ठाकरे राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्त झाल्यावर आमची काहीच हरकत नाही. आमचा विरोध नाही. राज्यपाल त्यांचा अधिकार वापरतील. राजकारण महाविकास आघाडीनं सुरु केलं. एवढ्या लवकर ठराव पास करण्याचं कारण नव्हतं. आम्ही अजिबात निगेटिव्ह भूमिका घेतली नाही‌. विधानपरिषदेवर जाण्यास आमचा विरोध नाही, तो अधिकार राज्यपालांचा असल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. तर संजय काकडे यांच्या आवाहनावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ते आमचे आहेत की आमचे नाही, हा विषय वेगळा’.

पीएम केअर निधीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आम्ही काय पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पैसे पाठवले नाहीत’. भारताच्याच पंतप्रधानांच्या निधीत देण्याचं आवाहन करत आहोत. मात्र महापुरामध्ये शिवसेनेने त्यांच्या आमदारांना त्यांच्या ट्रस्टमध्ये पैसे पाठवायला सांगितलं होत. आम्ही तसं करत नसल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला.

आघाडी नेत्यांचं ज्ञान कमी : चंद्रकांत पाटील

आघाडी नेत्यांना ज्ञान कमी आहे. तुमच्यात ताळमेळ नाही. दुसऱ्यावर दोष देऊन मोकळं व्हायचं. नाचता येईना अंगण वाकडे, अशी आघाडीची गत झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तर केंद्राने जास्त निधी हा महाराष्ट्राला दिल्याचा दावाही त्यांनी केला.

Chandrakant Patil On Pune Corona

संबंधित बातम्या :

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील टोल महागला, टोल दरात तब्बल 40 ते 122 रुपयांची वाढ

अतिरिक्त निर्बंध, तरीही पुणेकर ऐकेनात, सर्व बंद असूनही चिकन दुकान उघडलं, नागरिकांच्या रांगा

‘हॉटस्पॉट’ भवानी पेठेत 168 कोरोनाग्रस्त, पुण्यातील वॉर्डनिहाय रुग्णसंख्या

तीन वर्षांचे बाळ ते 92 वर्षीय आजी, पुण्यात 15 जणांच्या कुटुंबाची ‘कोरोना’वर मात

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.