AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोराच्या उलट्या बोंबा; कोरोना विषाणूचा जन्म भारतात झाला, चिनी संशोधकांचा दावा

चीनमधील संशोधकांनी या व्हायरसवरुन चीनवर होत असलेले आरोप भारताच्या माथी मारले आहेत.

चोराच्या उलट्या बोंबा; कोरोना विषाणूचा जन्म भारतात झाला, चिनी संशोधकांचा दावा
| Updated on: Nov 28, 2020 | 11:02 AM
Share

बीजिंग : गेल्या 8-10 महिन्यांपासून जगभरात कोरोना व्हायरसचं (Coronavirus) थैमान सुरु आहे. चीनमधील वुहान (Wuhan) शहरात कोरोना व्हायरसचा जन्म झाला असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला अनेक राष्ट्रांनी, तज्ज्ञांनी, आरोग्य संघटनांना, संस्थांनी तसा दावा केला होता, पुढे तो खरा ठरला. त्यामुळे जगभरातील लोकांचा चीनवर रोष आहेच. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या व्हायरसला चायनीज व्हायरस म्हणाले होते. परंतु चीनमधील संशोधकांनी या व्हायरसवरुन चीनवर होत असलेले आरोप भारताच्या माथी मारले आहेत. कोरोना व्हायरस भारतातूनच जगभरात पसरल्याचा आरोप चिनी संशोधकांनी दावा केला आहे. (Chinese Scientists claims Coronavirus originated in India during summer)

चीनच्या अकादमी ऑफ सायन्सेसमधील वैज्ञानिकांच्या एका गटाने म्हटलं आहे की, बहुधा 2019 च्या उन्हाळ्यात कोरोना विषाणूचा भारतात जन्म झाला असावा. कोरोना विषाणू जनावरांमुळे दूषित झालेल्या पाण्याद्वारे मानवांमध्ये प्रवेश करतो. भारतात तसंच झालं आणि त्यानंतर हा विषाणू चीनच्या वुहान शहरात पोहोचला. तिथेच या विषाणूची ओळख पटवण्यात संशोधकांना यश आलं.

भारतावर आरोप करण्यापूर्वी चीनमधील संशोधकांनी फिलोजेनेटिक विश्‍लेषण (कोरोना विषाणूचा प्रसार कसा होतो, याबाबतचा अभ्यास) सादर केलं आहे. ज्या व्हायरसचे कमी म्युटेशन झालं आहे त्यांचा शोध घेऊन व्हायरसचा स्रोत समजू शकतो, असे या वैज्ञानिकांनी या विस्लेषणात म्हटले आहे.

चीनी संशोधक म्हणाले की, वुहानमध्ये सापडलेला कोरोना व्हायरस पहिला व्हायरस नव्हता. हा व्हायरस बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्‍ट्रेलिया, भारत, इटली, चेक रिपब्लिक, रशिया किंवा सर्बिया यापैकी कुठल्यातरी देशात निर्माण झाला असावा. यापैकी भारत आणि बांगलादेश हे चीनच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे यापैकी एका देशातून कोरोना व्हायरसचा प्रसार होऊन तो व्हायरस वुहानपर्यंत पोहोचला असल्याची दाट शक्यता आहे. हा व्हायरस जुलै किंवा ऑगस्ट 2019 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला असावा, असे अनेक अंदाज चिनी संशोधकांनी व्यक्त केले आहेत.

दरम्यान, ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठात कार्यरत असलेले संशोधक डेव्हिड रॉबर्टसन डेली मेलशी बोलत असताना म्हणाले की, “चीनच्या अकादमी ऑफ सायन्सेसमधील वैज्ञानिकांनी मांडलेले संशोधन सदोश आहे. यापूर्वीदेखील त्यांनी कोणत्याही पुराव्याअभावी. अमेरिका आणि इटली या देशांवर आरोप केले होते. हा व्हायरस अमेरिका किंवा इटली या देशांमधून पसरला असल्याचा दावा चिनी संशोधकांनी केला होता. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत जे संशोधन केले आहे, जे पुरावे त्यांनी जगासमोर मांडले आहेत, त्यावरुन स्पष्ट होतं की, हा व्हायरस चीनमध्येच तयार झाला आहे”.

जगभरात कोरोनाचे 6 कोटी 19 लाख रुग्ण

जगभरातील 218 देशांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 6 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळले आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6 कोटींच्याही पुढे गेली आहे. तसेच गेल्या 24 तासात जगभरात 11 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 25 नोव्हेंबरला एकाच दिवसात 12 हजार रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर 24 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 11 हजार 733 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. यापैकी सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत नोंदवण्यात आले आहेत.

वर्ल्डोमीटर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगभरात 6 कोटी 19 लाख 88 हजार 71 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 4 कोटी 27 लाख 88 हजार 667 रुग्ण बरे झाले आहेत, तर 14 लाख 49 हजार 114 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 1 कोटी 77 लाख 55 हजार 744 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या

PM Modi Pune Visit Live Update | पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा, सिरम इन्स्टिट्यूटमधील कोरोना लसीचा आढावा

कोरोनाचा कहर वाढला; आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 31 डिसेंबरपर्यंत बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

(Chinese Scientists claims Coronavirus originated in India during summer)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.