ग्राऊंड रिपोर्ट – अयोध्या : ‘बालासाहब का बेटा आ रहा हैं’
अयोध्येतील काही महंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला समर्थन देत आहेत, तर काही महंत याचा विरोध करत आहेत.
अयोध्या : महाविकास आघाडी सरकारला आज 100 दिवस पूर्ण झाले आणि उद्या (Uddhav Thackeray Ayodhya Tour) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. श्री रामाचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा अयोध्या दौरा आहे. ‘बालासाहब का बेटा आ रहा हैं’, असं म्हणत एकीकडे या दौऱ्याचं जोरात स्वागत होत आहे. तर दुसरीकडे, काही महंत या दौऱ्याचा विरोध करत आहेत.
श्री राम नगरी अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स (Uddhav Thackeray Ayodhya Tour) फैजाबाद आणि अयोध्येत सर्वत्र झळकत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या 7 तारखेच्या अयोध्या दौऱ्यामुळे अयोध्येत भगवं वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्याचा कार्यक्रम कसा असणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या दुपारी दोन वाजता लखनऊ विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते लखनऊ ते अयोध्या कारने प्रवास करतील. दुपारी 3.30 वाजता अयोध्येत त्यांची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर सायंकाळी 4.30 वाजता उद्धव ठाकरे रामललाचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 च्या सुमारास ते पुन्हा लखनऊकडे रवाना होतील.
कोरोनामुळे उद्धव ठाकरे यांची शरयू आरती स्थगित
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या तयारीसाठी गेल्या चार दिवसांपासून खासदार संजय राऊत अयोध्येत ठाण मांडून बसले आहेत. शरयू आरतीचंही शिवसेनेनं नियोजन केलं होतं, पण कोरोना व्हायरसमुळे गर्दी टाळण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शरयू आरती स्थगित करण्यात आली.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, अयोध्येतील महंतांची धमकी
संजय राऊतांकडून राममंदिर परिसराची पाहणी
खासदार संजय राऊत यांनी आज राममंदिर परिसराची पाहणी केली. शिवाय, अयध्येतील अनेक महंतांच्या भेटी घेतल्या. लक्ष्मणकिलाधीश यांच्यासह अनेक महंत उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याचं स्वागत करत आहेत. तर, अयोध्येतील काही महंत उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्याला विरोध करत आहेत. शिवसेनं सत्तेत काँग्रेसची साथ सोडावी किंवा हिंदू राष्ट्रनिर्मितीबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी तपस्वी छावणीच्या महंतांनी केली आहे.
राहुल गांधी यांनीसुद्धा अयोध्येत यावं : संजय राऊत
“जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने महबूबा मुक्ती यांच्यासोबत सरकार बनवलं, तेव्हा अयोध्येत भाजप नेत्यांचा कुणी विरोध केला होता का? असा प्रश्न उपस्थित करत. जे विरोध करतायत त्यांनी हिंदूत्वाची व्याख्या पहावी, एक दोन महंत विरोध करत आहेत. तर मोठ्या प्रमाणात साधू संत स्वागत करत आहेत”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
अयोध्येतील राममंदिर सर्वांचं आहे, राममंदिर बांधण्याच्या सेवेत शिवसैनिक येणार, अशी घोषणाही संजय राऊत यांनी यावेळी केली. राहुल गांधी यांनीसुद्धा अयोध्येत यावं, सर्वांनी मंदिर बांधण्याच्या कामात (Uddhav Thackeray Ayodhya Tour) सहकार्य करावं, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या :
अयोध्येला जाताना हे लक्षात ठेवा, संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
मुलगी पळवून नेऊ म्हणणारे विधानसभेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
जयंत पाटील ‘मुनगंटीवार के हसीन सपने’ पुस्तक लिहितील, त्याची प्रस्तावना मी लिहीन : संजय राऊत
मित्राने मला समजावं, म्हणून अर्थसंकल्पावर सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं : उद्धव ठाकरे