भाऊ, कुशल, निलेश साबळेंविरोधात ‘संभाजी ब्रिगेड’ची पोलिसात तक्रार

'चला हवा येऊ द्या' मालिकेच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश साबळे यांच्याविरोधात सोलापुरातील पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे Complaint against Nilesh Sabale

भाऊ, कुशल, निलेश साबळेंविरोधात 'संभाजी ब्रिगेड'ची पोलिसात तक्रार
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 3:34 PM

सोलापूर : ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश साबळे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सोलापुरात ‘संभाजी ब्रिगेड’च्या वतीने पोलिसात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. (Complaint against Nilesh Sabale)

‘चला हवा येऊ द्या’ मालिकेच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याची फिर्याद विजापूर नाका पोलिसात दाखल करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड या महापुरुषांची नक्कल आणि विनोद केल्याचा आरोप ‘संभाजी ब्रिगेड’ने केला आहे.

दरम्यान, राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी निलेश साबळेंच्या माफीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर साबळेंनी व्हिडीओ शेअर करत दिलगिरी व्यक्त केली.

निलेश साबळे काय म्हणाले?

“कालपासून एक फोटो फिरतो आहे. तो चला हवा येऊ द्यामध्ये दाखवलेला असल्याने बरेचसे गैरसमज निर्माण झाले आहेत. खरंतर ते स्किट आणि प्रहसन वेगळं होतं. त्यामध्ये तो फोटो वेगळ्या कारणाने, वेगळ्या अर्थाने वापरला होता. त्यामध्ये कोणत्याही महापुरुषांचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नव्हता. तो पूर्वीही नव्हता, यापुढेही कधीच नसेल. पण त्यामुळे थोडासा वाद निर्माण झाला. गैरसमज निर्माण झाले. त्यामुळेच मी तुमच्यासमोर आलो आहे.” असं निलेश सांबळेंनी सांगितलं.

हेही वाचा : निलेश साबळेंच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा, खासदार संभाजीराजेंकडून माफीची मागणी

“खरंतर छत्रपती शाहू महाराज किंवा या देशातील सर्वच महान व्यक्ती यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यामध्ये वापरलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता. पण ज्याही राजांचा होता त्यांच्याबद्दलही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. सर्वच महापुरुषांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. अगदीच तांत्रिक गोष्टीतून झालेली ती चूक होती. त्यामुळे याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, मी माफी मागतो. क्षमस्व” अशा शब्दात साबळेंनी माफी मागितली.

संभाजीराजे काय म्हणाले होते?

संभाजीराजेंनी ‘चला हवा..’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला होता. ‘लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरु करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे.’ असं संभाजीराजे म्हणाले होते.

लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे.

‘निलेश साबळे तसेच झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी आणि दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशाराही छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता. ‘आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रुपांतरित केलं. सयाजीराव  गायकवाडांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही, की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’ अशी खंतही संभाजीराजेंनी व्यक्त केली होती. (Complaint against Nilesh Sabale)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.