AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची बैठक, उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्यासह 22 पक्षाचे नेते बैठकीला हजर

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली (Sonia Gandhi Opposition Meet) विरोधी पक्षांच्या नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक पार पडली.

सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची बैठक, उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्यासह 22 पक्षाचे नेते बैठकीला हजर
| Updated on: May 22, 2020 | 7:25 PM
Share

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली (Sonia Gandhi Opposition Meet) विरोधी पक्षांच्या नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. कोरोना संकटकाळात पहिल्यांदाच विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला 22 पक्षाचे नेते असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

कोरोनाच्या संकटकाळात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र झाले (Sonia Gandhi Opposition Meet)  आहेत. या बैठकीच्या सुरुवातीला अम्फान चक्रीवादळामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. “केंद्र सरकारने अम्फान चक्रीवादळाला तातडीने राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, तसेच या चक्रीवादळाचा फटका ज्या राज्यांना बसला आहे, त्यांना आर्थिक मदत द्या,” अशी मागणी यात करण्यात आली.

या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, डीएमके नेते एम के स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सहभागी झाले होते.

विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधी काय म्हणाल्या?

1. कोरोना म्हणजे 21 दिवसांचं युद्ध आहे, असा भ्रम मोदींनी देशासमोर उभा केला आहे. 2. सरकारकडे लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचं कसलंच धोरण नाही. 3. काँग्रेससह समविचारी पक्षांनी अशा संकटात गरिबांच्या खात्यात थेट मदतीची मागणी केली आहे. 4. सरकारनं थेट खात्यात पैसे टाकण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आहे. 5. भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोना संकटाच्या आधीच घरघर लागली आहे 6. 2017 च्या मध्यापासून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था गोत्यात 7. सलग 7 तिमाहींमध्ये जीडीपीची घसरण झाली आहे, ही साधी गोष्ट नव्हती.

शरद पवार काय म्हणाले?

1. रस्ते, विमान आणि रेल्वे वाहतूक हळूहळू सुरु करणं गरजेचं 2. राज्यांमध्ये नव्या गुंतवणुकीसाठी नवं धोरण आखलं जावं 3. उद्योजक, तज्ञ मंडळींसोबत नव्या धोरणांबाबत चर्चा केली जावी 4. शैक्षणिक संस्था बंद राहिल्या तर विद्यार्थ्यांचं, संस्थाचालकांचं नुकसान होईल 5. एक तज्ञांचा गट त्यासाठी तयार करण्यात यावा 6. पंतप्रधानांनी राजकीय पक्षांशी संवाद साधावा, आम्हाला गांभीर्यानं ऐकावं 7. 10 पॉईंटचा अजेंडा विरोधी पक्षांतर्फे पंतप्रधानांना दिला जाईल 8. वैयक्तिक राजकीय फायद्यात न पडता, या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा 9. राज्यांना आर्थिक मदत करण्यासाठी खरेपणाने प्रयत्न करावेत 10. संसदीय कमिट्यांमार्फत काम केलं जावं, त्यांची आता नितांत गरज

संजय राऊत यांचे मुद्दे

  • या बैठकीत पुढील अॅक्शन प्लॅन काय असावा यासंदर्भात चर्चा झाली.
  • आर्थिक पॅकेज, स्थलांतरांचा, शेतकरी, कामगार यांच्याबाबत चर्चा झाली.
  • या बैठकीतील चर्चेतून काही मागण्यांचे पत्रक काढले जाईल.
  • अर्थव्यवस्था चालण्यासाठी विमाने आणि काही ट्रेनही चालल्या पाहिजेत.
  • मुंबईत ऑनलाईन मद्यविक्री हे अर्थव्यवस्था चालवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल असेल.

संबंधित बातम्या : 

गरिबांसाठी 50 हजार कोटींचं पॅकेज द्या, फडणवीसांची मागणी, 1 लाख 60 हजार कोटीचं गणित मांडलं

Mera Angan Mera Ranangan | भाजपच्या आंदोलनाबाबत अखेर एकनाथ खडसेंची भूमिका जाहीर

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.