भाजपला शेतकरी आंदोलनाचा झटका; हरियाणात खट्टर सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची काँग्रेसची घोषणा

सध्याची परिस्थिती पाहता खट्टर सरकारने जनता आणि विधानसभा दोहोंचा विश्वास गमावला आहे.| Congress leader BS Hooda

भाजपला शेतकरी आंदोलनाचा झटका; हरियाणात खट्टर सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची काँग्रेसची घोषणा
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 4:51 PM

चंदीगड: दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे (Farmers protest) पडसाद आता हरियाणात उमटायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या रोषामुळे आता हरियाणातील भाजप सरकार (Manohar Lal Khattar govt) कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, आता काँग्रेस पक्षाने हरियाणातील खट्टर सरकारविरोधात विधिमंडळात अविश्वास ठराव मांडणार असल्याची घोषणा केली आहे. (Congress Legislative party in Haryana take decision to put no-confidence motion in special session of Assembly)

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी हरियाणातील काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेस विधीमंडळ पक्षाने विशेष अधिवेशन बोलावून सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. सध्याची परिस्थिती पाहता खट्टर सरकारने जनता आणि विधानसभा दोहोंचा विश्वास गमावल्याचे वक्तव्य हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भुपिंदरसिंह हुड्डा यांनी केले.

शेतकऱ्यांबाबत मोठी चूक केल्यामुळे हरियाणा सरकार सध्या वाईट अवस्थेत आहे. शेतकऱ्यांना वॉटर कॅननद्वारे पाण्याचा मारा करणे शेतकऱ्यांवर किंवा अश्रुधुराची नळकांडी फोडणे हरियाणा सरकारला थांबवता आले नसते का? हरियाणा सरकारची ही कृती निषेधार्ह आहे.

हरियाणा सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांना ‘खलिस्तानी’ आणि ‘काँग्रेसी’ म्हणून हिणवण्यात आले. शेतकरी आपल्या रास्त मागण्या घेऊन आले होते, जात, पंथ आणि प्रदेश या सगळ्यापलीकडचे हे आंदोलन होते. एवढ्या थंडीतही शेतकरी आंदोलन करत आहेत, असे भुपिंदरसिंह हुड्डा यांनी म्हटले.

शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही तर दुष्यंत चौटालांचा राजीनामा देण्याचा इशारा

आता काँग्रेसच्या अविश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या घोषणेनंतर खट्टर सरकार काय भूमिका घेणार, हे आता पाहावे लागेल. हरियाणात सध्या भाजप आणि जननायक जनता पार्टी (JJP) यांचे संयुक्त सरकार आहे. जननायक जनता पार्टीच्या दुष्यंत चौटाला यांनी यापूर्वीच भाजपला इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि इतर मागण्या मान्य करा. भाजपने ही बाब मान्य न केल्यास दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.

संबंधित बातम्या:

‘हम करे सो कायदा’ चालणार नाही, पंजाबच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला झुकवले; शिवसेनेचा हल्लाबोल

शेतकऱ्यांचा बाणेदारपणा, सरकारचं जेवण नाकारलं; म्हणाले, ‘आम्ही आमचं जेवण सोबत आणलंय’

(Congress Legislative party in Haryana take decision to put no-confidence motion in special session of Assembly)

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.