‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा धिक्कार असो’, अश्या घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्याचे पुण्यात आंदोलन
महाराष्ट्रात भाजपाची सरकार आली नाही म्हणून आकसापोटी महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी सुरूवातीच्या काळात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे लाखो देशवासियांच्या जीव गेला. गंगेत बहुसंख्य प्रेत फेकून देण्यात आले होते.
पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत असे सांगितले की, महाराष्ट्र काँग्रेसमुळे (Maharashtra Congress)देशात कोरोना पसरला. पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे(Ramesh Bagawe ) यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिका जवळील भारतीय जनता पक्षाच्या(Bharatiya Janata Party) कार्यालयासमोर निदर्शने – आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या. ‘‘महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान मोदींचा धिक्कार असो’, ‘माफी मागों माफी मागों, मोदीजी माफी मागों’ अशा प्रकारचे फलक घेवून कार्यकर्ते निदर्शनाच्या ठिकाणी जमले होते.
जनता त्यांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही
पंतप्रधान संसदेत खोट बोलले आणि त्यांनी जाणून बुजून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या व देशाच्या जनतेची माफी मागावी अन्याता जनता त्यांना सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही.’’ असे मत शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केलं आहे. माजी आमदार मोहन जोशी म्हणाले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यापासून प्रत्येकवेळी कोणत्या न कोणत्या कारणावरून महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. संसदेत कोरोना विषयी ते खोटे बोलून देशातील जनतेची दिशाभूल करीत आहेत.
आकसापोटी महाराष्ट्राचा अपमान
महाराष्ट्रात भाजपाची सरकार आली नाही म्हणून आकसापोटी महाराष्ट्राचा अपमान करीत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी सुरूवातीच्या काळात कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे लाखो देशवासियांच्या जीव गेला. गंगेत बहुसंख्य प्रेत फेकून देण्यात आले होते. अनेकांचे संसार उध्वस्त होऊन मुले अनाथ झाले. राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील संसदेत आपली भूमिका मांडली. त्यांनी सरकार अनेक धोरणावर कसे अपयशी ठरले याचा पर्दाफाश केला. परंतु पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या भाषणावर न बोलता निवडणुकीचे भाषण करत होते. भारताच्या संसदेत आजपर्यंत अशा पध्दतीने कोणतेही पंतप्रधान बोलले नाही. महाराष्ट्र काँग्रेसने यु.पी. आणि बिहारच्या लोकांना रेल्वेने आपल्या गावाला पाठविले त्यामुळे कोरोना पसरला असे खोटे आरोप पंतप्रधानांनी केले. रेल्वे तर केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. मग महाराष्ट्र काँग्रेसने कसा काय कोरोना पसरविला याचे उत्तर द्यावे.’’ या आंदोलनात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
Rohit sharma: रोहित शर्मा भर मैदानात चहलवर ओरडला, त्यावर आता युजवेंद्रने दिलं उत्तर