AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिशन बिगीन अगेननंतर महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ, अवघ्या 6 दिवसात तब्बल 18 हजार 500 रुग्ण

लॉकडाऊनला कंटाळून लोक बाहेर पडत असताना, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे. (Corona cases increased after mission begin again)

मिशन बिगीन अगेननंतर महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ, अवघ्या 6 दिवसात तब्बल 18 हजार 500 रुग्ण
| Updated on: Jun 13, 2020 | 8:49 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रात अनलॉकिंगला सुरुवात झाल्यापासून म्हणजेच 8 जूनपासून कोरोनाने झेप घेतल्याचं चित्र आहे. लॉकडाऊनला कंटाळून लोक बाहेर पडत असताना, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे. (Corona cases increased after mission begin again) कारण 8 जून ते 13 जून या सहा दिवसात महाराष्ट्रात तब्बल 18 हजार 593 इतके रुग्ण वाढलेत. गेल्या चार दिवसापासून रुग्णवाढीचा वेग हा तीन हजारांच्या पुढेच आहे. तर दररोज शंभरपेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.

ठाकरे सरकारच्या ‘पुनश्च हरि ओम’ अर्थात ‘मिशन बिगीन अगेन’चा तिसरा टप्पा  सोमवार 8 जूनपासून सुरु झाला. खासगी कार्यालये दहा टक्के कर्मचारी वर्गासह पुन्हा सुरु करण्यात आले. तर मुंबईतील ‘बेस्ट’ बससेवा सुरु झाली. कंटेन्मेंट झोन वगळता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या सवलती तिसऱ्या टप्प्यात कायम आहेत. त्यामुळे रस्त्यावर, बसमध्ये तुडुंब गर्दी आणि वाहनांची वर्दळ दिसत आहे.

त्याचाच परिणाम म्हणजे 8 जूनपासून रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे.  राज्यात आज 3 हजार 427 इतके कोरोनाचे नवे रुग्ण वाढले. तर दिवसभरात 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 4 हजार 568 वर पोहोचली आहे.  आज 1550 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर आतापर्यंत 49 हजार 346 रुग्ण बरे झाले आहेत.  त्यामुळे राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 51 हजार 379 झाली आहे.

गेल्या सहा दिवसातील रुग्णवाढ

  • सोमवार (८ जून) – २५५३ (मृत्यू – १०९)
  • मंगळवार (९ जून) – २२५९ (मृत्यू – १२०)
  • बुधवार (१० जून) – ३२५४  (मृत्यू – १४९ )
  • गुरुवार (११ जून) – ३६०७ (मृत्यू – १५२)
  • शुक्रवार (१२ जून) – ३४९३ (मृत्यू – १२७)
  • शनिवार (१३ जून) – ३४२७ (११३ मृत्यू)
  • एकूण  – 18 हजार 593

सहा दिवसात मृतांची संख्या 

  • सोमवार – 109
  • मंगळवार – 120
  • बुधवार – 149
  • गुरुवार – 152
  • शुक्रवार – 127
  • शनिवार – 113
  • एकूण – 770

(Corona cases increased after mission begin again)

संबंधित बातम्या 

Maharashtra Corona Update | दिवसभरात 3,493 नवे रुग्ण, कोरोनाबाधित रुग्ण संख्या 1 लाखांवर

मिशन बिगीन अगेन | तिसरा टप्पा सुरु, कोणती बंधने कायम, कोणत्या नियमांना शिथिलता? 

 खिडक्या उघडा, तीन फुटांवर बसा, राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी गाईडलाईन्स

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.