Corona Death India | देशात ‘कोरोना’चा सहावा बळी, पाटणामध्ये एकाचा मृत्यू
बिहारमधील पाटणामध्ये एका 38 वर्षीय तरुणाचा (Corona Death India) एम्स रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
पाटणा : देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 6 वर पोहोचला (Corona Death India) आहे. आज (22 मार्च) बिहारमधील पाटणामध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 2, कर्नाटक, दिल्ली, पंजाबमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील पाटणामध्ये एका 38 वर्षीय तरुणाचा (Corona Death India) एम्स रुग्णालयात मृत्यू झाला आहे. हा तरुण कतारमधून बिहारमध्ये आला होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती.
एम्समधील डॉ. प्रभात कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (21 मार्च) पाटणामधील एम्स रुग्णालयात एका तरुणाचा किडनी फेलमुळे मृत्यू झाला. हा मृत तरुण कोरोनाबाधित होता. तो पाटणामधील मंगर गावात राहणार आहे. दोन दिवसांपूर्वी तो कोलाकातामधून त्याच्या गावी परतला होता.
Bihar: The 38-year-old man who has passed away at AIIMS in Patna and tested positive for #COVID19, had foreign travel history to Qatar. https://t.co/Tmcc4Qo7Gp
— ANI (@ANI) March 22, 2020
तर दुसरीकडे आज महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 63 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण पंधरा दिवसांपूर्वी सुरतमधून आला होता. त्याला 19 मार्च रोजी मुंबईतील एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज उपचारादरम्यानच रुग्णाचा मृत्यू झाला.
A 38-year-old man has passed away in Bihar today due to kidney failure; he has been tested positive for #Covid19. He was from Munger. He died yesterday at AIIMS in Patna; had returned from Kolkata two days back: Dr. Prabhat Kumar Singh, AIIMS Patna, Bihar pic.twitter.com/H1xDi1VSJM
— ANI (@ANI) March 22, 2020
कोरोनामुळे याअगोदर 17 मार्च रोजी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात 64 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पाच दिवसांनी मुंबईतच दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला (Corona Death India) आहे.
महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
- पिंपरी चिंचवड – 12
- पुणे – 11
- मुंबई – 19
- नागपूर – 4
- यवतमाळ – 4
- कल्याण – 4
- नवी मुंबई – 3
- अहमदनगर – 2
- पनवेल – 1
- ठाणे -1
- औरंगाबाद – 1
- रत्नागिरी – 1
- उल्हासनगर – 1 एकूण 74
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
- पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
- पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
- पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
- मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
- नागपूर (1) – 12 मार्च
- पुणे (1) – 12 मार्च
- पुणे (3) – 12 मार्च
- ठाणे (1) – 12 मार्च
- मुंबई (1) – 12 मार्च
- नागपूर (2) – 13 मार्च
- पुणे (1) – 13 मार्च
- अहमदनगर (1) – 13 मार्च
- मुंबईत (1) – 13 मार्च
- नागपूर (1) – 14 मार्च
- यवतमाळ (2) – 14 मार्च
- मुंबई (1) – 14 मार्च
- वाशी (1) – 14 मार्च
- पनवेल (1) – 14 मार्च
- कल्याण (1) – 14 मार्च
- पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
- औरंगाबाद (1) – 15 मार्च
- पुणे (1) – 15 मार्च
- मुंबई (3) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- यवतमाळ (1) – 16 मार्च
- नवी मुंबई (1) – 16 मार्च
- मुंबई (1) – 17 मार्च
- पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
- पुणे (1) – 18 मार्च
- पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
- मुंबई (1) – 18 मार्च
- रत्नागिरी (1) – 18 मार्च
- मुंबई महिला (1) – 19 मार्च
- उल्हासनगर महिला (1) – 19 मार्च
- अहमदनगर (1) – 19 मार्च
- मुंबई (2) – 20 मार्च
- पुणे (1) – 20 मार्च
- पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
- पुणे (2) – 21 मार्च
- मुंबई (8) – 21 मार्च
- यवतमाळ (1) – 21 मार्च
- कल्याण (1) – 21 मार्च
- मुंबई (6) – 22 मार्च
- पुणे (4) – 22 मार्च
- एकूण – 74 कोरोनाबाधित रुग्ण
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
- कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
- दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
- मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
- पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
- महाराष्ट्र – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
- पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
- एकूण – 6 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू