कोरोनाचा कहर, देशात 24 तासात 909 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 8,356 वर
देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 8,356 वर पोहोचला आहे (Corona in India). गेल्या 24 तासात देशात 909 नवे रुग्ण आढळले आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 8,356 वर पोहोचला आहे (Corona in India). गेल्या 24 तासात देशात 909 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 273 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली (Corona in India).
देशात जे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्यापैकी 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळले तर 20 टक्के रुग्णांना आयसूमध्ये दाखल करावं लागलं. त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही, असे लव अग्रवाल म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 लाख 86 हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 4.3 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं, अशी माहितीदेखील यावेळी देण्यात आली.
दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि नर्सेस यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी विविध राज्यांमध्ये विशेष हॉस्पिटलची सोय केली जात आहे. मुंबईत 700 खाटांचे विशेष हॉस्पिटल तर केरळमध्ये 900 खाटांचे हॉस्पिटल तयार करणायत आलं आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये विशेष आरोग्य अधिकारी असणार आहे, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं.
“कोरोनाचा सामना करण्यासाठी 9 एप्रिलला आपल्याला 1100 विशेष बेड्सची आवश्यकता होती. त्यावेळी आपल्याजवळ 85 हजार विशेष बेड्स होते. आज 1671 विशेष बेड्सची गरज आहे तर आपल्याकडे 1 लाख 5 हजार विशेष बेड्स देशभरातील एकूण 600 हॉस्पिटल्समध्ये आहेत”, अशी माहिती लव अग्रवला यांनी दिली.
As per 9th April data, if we needed 1,100 beds we had 85,000 beds. Today when we need 1,671 beds, then we have 1 lakh 5 thousand beds in the dedicated 601 #COVID hospitals: Lav Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry https://t.co/sB7wqfHea1 pic.twitter.com/OplUFXTVjL
— ANI (@ANI) April 12, 2020
जगभरातील अनेक देशांनी हायड्रोक्लोरिक्वीन औषधाची मागणी केली आहे. मात्र, आपली गरज बघून केंद्र सरकारने 13 देशांना हे औषध देण्याचं ठरवलं आहे, असंदेखील यावेळी सांगण्यात आलं.
Some countries had requested India for supply of HCQ (Hydroxychloroquine). After making an assessment of domestic requirement & keeping the buffer, Govt has approved release of HCQ for 13 countries: KS Dhatwalia, Principal Spokesperson, Govt of India. #COVID19 pic.twitter.com/Dv3Llni0m1
— ANI (@ANI) April 12, 2020