Delhi health minister Satyendra Jain : दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोना, आप आमदारालाही लागण

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona infection to Delhi Healh Minister).

Delhi health minister Satyendra Jain : दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना कोरोना, आप आमदारालाही लागण
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 9:49 PM

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Corona infection to Delhi Health Minister). त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या कार्यालयानेच ही अधिकृत माहिती दिली आहे. यासोबतच दिल्लीतील आपच्या आमदार आणि शिक्षणतज्ज्ञ आतिशी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आला आहे. यानंतर त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घेतलं आहे.

सत्येंद्र जैन यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची काल कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आज पुन्हा चाचणी केल्यानंतर दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

आमदार आतिशी यांना मंगळवारपासून (16 जून) सर्दी-खोकला ही लक्षणं दिसली. यानंतर तात्काळ त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. आज याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर त्यांनी तात्काळ स्वतःला विलगीकरणात ठेवलं आहे. सध्या आतिशी यांची लक्षणं सामान्य आहेत. आतिशी कोरोना प्रकरणांवर आरोग्य विभागासोबत काम करत होत्या. 11 जून रोजी आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर 11 जूनपासूनच आतिशी यांनी स्वतःला घरात वेगळं केलं.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal COVID 19 Tests) यांना देखील कोरोनाची लक्षणं दिसली होती. यानंतर त्यांचीही कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. आम आदमी पक्षाचे आमदार राघव चड्डा यांनी ही माहिती दिली होती (Delhi CM Arvind Kejriwal Tests Negative For COVID-19).

अरविंद केजरीवाल यांना ताप आला होता आणि त्यांच्या घशात खवखवत होतं, त्यामुळे त्यांनी रविवारपासून (7 जून) स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं होतं. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

संबंधित बातम्या  

अरविंद केजरीवाल यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह

अरविंद केजरीवालांची उद्या कोरोना चाचणी, तूर्तास स्वत: आयसोलेट

शनिवार-रविवार लाड नाही, वीकेंडला सक्तीने लॉकडाऊन, पंजाब सरकारचा मोठा निर्णय   

Patanjali CoronaVirus Medicine : कोरोनावर औषध तयार, पतंजलीचे आचार्य बालकृष्ण यांचा दावा 

Corona infection to Delhi Health Minister

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.