Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
[svt-event title=” शिवसेनेच्या सर्व आमदारांचे 1 महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला” date=”27/03/2020,2:30PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची माहिती विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कालच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे आमदार म्हणून मिळणारे 1 महिन्याचे मानधन […]
[svt-event title=” शिवसेनेच्या सर्व आमदारांचे 1 महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला” date=”27/03/2020,2:30PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनेच्या सर्व आमदारांचे एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची माहिती विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कालच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे आमदार म्हणून मिळणारे 1 महिन्याचे मानधन सुपूर्द केले होते. [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये नगरसेवकाच्या मुलाचे 15 माणसांच्या उपस्थितीत लग्न” date=”27/03/2020,2:23PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये नगरसेवकांच्या मुलाचे लग्न 15 माणसांच्या उपस्थितीत लावण्यात आले. सात हजार पत्रिका वाटुनही धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. [/svt-event]
[svt-event title=”पुढील तीन महिन्यांसाठी ईएमआय स्थगित” date=”27/03/2020,2:19PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील तीन महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या कर्जांच्या हप्त्यांची परतफेड (ईएमआय) स्थगीत करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्वसमान्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. [/svt-event]
[svt-event title=”रत्नागिरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बाईकला बंदी” date=”27/03/2020,2:05PM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात आता बाईकवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत मिश्रा यांनी हा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊननंतरही लोक रस्त्यावर बाईक घेऊन फिरत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. [/svt-event]
[svt-event title=”नागपूर : कोरोनावर मात करुन घरी आला, नजर उतरवून, औक्षण करुन गृहप्रवेश” date=”27/03/2020,12:05PM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण बरा होऊन काल घरी परतला. यावेळी त्याच्या घरी त्याच्या आईने त्याची नजर उतरवली. तसेंच त्याची ओवाळणी करून स्वागत करण्यात आलं. अमेरिकेवरून आलेल्या या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या त्याची पत्नी, मावस भाऊ आणि मित्रालाही कोरोना लागण झाली. या पहिल्या रुग्णाच्या तीन टेस्ट निगेटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी त्याला बरं झाल्याचा निर्वाळा देत रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र पुढील आणखी काही दिवस त्याला होम कोरोंटाइन ठेवण्यात आलं आहे. [/svt-event]
[svt-event title=”कोरोनाच्या मुकाबल्यासाठी साई संस्थानकडून 51 कोटी ” date=”27/03/2020,10:42AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या मुकाबल्यासाठी साई संस्थानकडून सरकारला 51 कोटी रुपयांची मदत केली जणार आहे. लवकरच साई संस्थानकडून अधिकृत घोषणा केली जाणार आहे. न्यायालयाने नियुक्ती केलेल्या कमिटीची मान्यता मिळताच निधी दिला जाणार आहे. तसेच साई संस्थानकडून पोलीस कर्मचारी, गरजवंताना नाष्टा, भोजन पुरवणार आहे. [/svt-event]
[svt-event title=” कोरोनामुळे नाशिक कारागृहातील 57 कैद्यांना सोडलं” date=”27/03/2020,10:35AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक कारागृहातील 57 कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आलं आहे. मोठ्या गुन्ह्यातील कैद्यांना मात्र यामधून सूट नाही. कारागृहात येताना प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्याची थर्मामीटरने तपासणी होत आहे. [/svt-event]
[svt-event title=” शहरात संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या 295 नागरिकांवर गुन्हे दाखल ” date=”27/03/2020,10:27AM” class=”svt-cd-green” ] शहरात संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या 295 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. नाशिकमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे नजर ठेवली जाणार आहे. [/svt-event]
[svt-event title=”रेपो रेटमध्ये 0.75 टक्क्यांची कपात” date=”27/03/2020,10:23AM” class=”svt-cd-green” ]
रेपो रेटमध्ये 0.75 टक्क्यांची कपात, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तिकांता दास यांची मोठी घोषणा, आता रेपो रेट 4.4 टक्क्यांवर pic.twitter.com/yvhY0gk6zq
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2020
[/svt-event]
[svt-event title=”दिव्यांगाना अॅडव्हान्समध्ये एक महिन्याची पेन्शन” date=”27/03/2020,10:20AM” class=”svt-cd-green” ] दिव्यांगाना अॅडव्हान्समध्ये एक महिन्याची पेंशन मिळणार आहे. तसेच संचारबंदीच्या काळात दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू घरपोच वाटप करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यासोबत एक महिना पुरेल एवढे सामानही देण्यात येणार आहे. तसेच रेशन दुकानातून दिव्यांग व्यक्तीं किंवा त्याच्या घरातील व्यक्तीला विना रांग देण्याच्या सूचना दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने दिल्या आहेत. [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात दोन हजार 190 जण होम क्वारंटाईन, सॉफ्टवेअरद्वारे संशयीत रुग्णांवर लक्ष” date=”27/03/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात दोन हजार 190 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर क्वारंटाईन करण्यात आलेल्यांवर सॉफ्टवेअरद्वारे लक्ष ठेवण्यात आले आहे. तसेच क्वारंटाईन करण्यात आलेल्यांची नावं, पत्ते आणि मोबाईल नंबरची यादी स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. [/svt-event]
[svt-event title=”नागपूरात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण ” date=”27/03/2020,10:07AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कोरोनाचे आणखी पाच रुग्ण सापडले आहेत. काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने चारजणांना कोरोनाची लागण, तर गोंदियातील एकालाही कोरोनाची लागण झाली आहे. [/svt-event]
[svt-event title=”बाहुबली फेम प्रभासची पीएम रिलीफ फंडला 4 कोटींची मदत ” date=”27/03/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] बाहुबली फेम अभिनेता प्रभासने पीएम रिलीफ फंडला 4 कोटींची मदत केली आहे. 3 कोटी पीएम रिलीफ फंड आणि प्रत्येकी 50 लाख रुपये तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे. [/svt-event]
[svt-event title=” सचिन तेंडूलकरची राज्य आणि केंद्र सरकारला 50 लाखांची मदत ” date=”27/03/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] कोरोना विषाणूसोबत लढण्यासाठी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत केली आहे. [/svt-event]
[svt-event title=”पिंपरी-चिंचवडमधले तीन रुग्ण निगेटिव्ह” date=”27/03/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी-चिंचवडमधले तीन रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. आज या तिन्ही रुग्णांना डिसचार्ज देण्यात येणार आहेत. दुसरा रीपोर्टही निगेटिव्ह आल्याने डिसचार्ज देणार आहे. काल पुण्यात एकूण पाच जणांचे रीपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. राज्यात आता एकूण 18 प़ॉझिटिव्ह रुग्णांचा रीपोर्ट निगेटिव्ह आला आहे. [/svt-event]