‘कोरोना’शी झुंजणाऱ्या गृहलक्ष्मीसाठी मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा, 20 कोटी महिलांच्या जनधन खात्यात रक्कम

आठ कोटी 30 लाख कुटुंबांना 'उज्ज्वला गॅस योजने' अंतर्गत पुढचे तीन महिने मोफत सिलिंडर मिळणार आहे. (Corona Package announcement for women)

'कोरोना'शी झुंजणाऱ्या गृहलक्ष्मीसाठी मोदी सरकारच्या मोठ्या घोषणा, 20 कोटी महिलांच्या जनधन खात्यात रक्कम
Follow us
| Updated on: Mar 26, 2020 | 2:38 PM

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जात आहे. कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी 1 लाख 70 हजार कोटीचं पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना पुढील तीन महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. ‘कोरोना’शी झुंजणाऱ्या गृहलक्ष्मीसाठी मोदी सरकारने मोठ्या घोषणा केल्या आहेत. (Corona Package announcement for women)

आठ कोटी 30 लाख कुटुंबांना ‘उज्ज्वला गॅस योजने’ अंतर्गत पुढचे तीन महिने मोफत सिलिंडर मिळणार आहे. 63 लाख महिला बचत गटांना 10 लाखांऐवजी 20 लाखांपर्यंत व्याजमुक्त कर्जपुरवठा केला जाणार आहे. याचा लाभ 7 कोटी कुटुंबांना होणार आहे. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना पुढील तीन महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान  मिळेल.

पंतप्रधान अन्न योजनेअंतर्गत, एकही गरीब अन्नाशिवाय राहू नये याची दक्षता घेतली जाणार आहे. जवळपास 80 लाख लाभार्थ्यांना पुढील तीन महिने 5 किलो तांदूळ किंवा गहू मोफत मिळेल. सध्या मिळत असल्याच्या अतिरिक्त हा पुरवठा मिळेल. याशिवाय सोबत एक किलो डाळही मोफत मिळेल.

निर्मला सीतारमन यांच्या महत्त्वाच्या घोषणा (Corona Package announcement for women) 1. केंद्र सरकारचे 1 लाख 70 हजार कोटींचे पॅकेज 2. वैद्यकीय कर्मचा-यांना 3 महिन्यांसाठी 50 लाखांच्या विम्याचे कवच 3. देशात कोणही उपाशी राहणार नाही 4. शहर-ग्रामीण भागातील गरीब, स्थलांतरीत मजुरांना तातडीने मदत 5. प्रधान मंत्री अन्न कल्याण योजनेची घोषणा 6. अन्न कल्याण योजनेंतर्गत, 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ,1 किलो दाळ मोफत 7. 80 कोटी लोकांना अन्न कल्याण योजनेचा लाभ 8. आठ कोटी 69 लाख शेतक-यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रु.लगेच देणार 9. रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक मजुराच्या खात्यावर 2 हजार रु. टाकणार 10. अन्न कल्याण योजनेंतर्गत तीन महिने मोफत धान्य पुरवठा 11. रोहयो अंतर्गत रोजच्या मजुरीत 182 वरुन 202 रु.पर्यंत वाढ, 5 कोटींना फायदा 12. तीन कोटी ज्येष्ठ नागरिक,विधवा, दिव्यांगांना 1 हजार रु.सानुग्रह अनुदान 13. दिव्यांगांना 1 हजार रुपयांचे अतिरीक्त सानुग्रह अनुदान 14. जनधन खाते असलेल्या 20 कोटी महिलांना 3 महिने 500 रुपयांचे सानुग्रह अनुदान 15. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना 3 महिने मोफत गॅस सिलिंडर 16. आठ कोटी 30 लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत 3 महिने मोफत सिलिंडर 17. 63 लाख बचत गटांना 10 ऐवजी 20 लाखांचा व्याजमुक्त कर्जपुरवठा, 7 कोटी कुटुंबांना लाभ 18. 100 पेक्षा कमी कर्मचा-यांच्या कंपन्यांतील 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्यांचा EPF सरकार 3 महिने भरणार

(Corona Package announcement for women)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.