AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईनंतर आता नागपुरात ‘कोरोना’ सर्व्हे, पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर (Corona Survey Nagpur) परिसरात सर्व्हे करण्यात येणार आहे.

मुंबईनंतर आता नागपुरात ‘कोरोना’ सर्व्हे, पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश
| Updated on: Mar 24, 2020 | 7:21 PM
Share

नागपूर : नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर (Corona Survey Nagpur) परिसरात सर्व्हे करण्यात येणार आहे. नागपूरमधील लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनअंतर्ग़त येणाऱ्या सुमारे 50 हजार कुटुंबातील दोन लाख लोकांपर्यंत मनपाच्या आरोग्य विभागाची चमू पोहोचली. आता या दोन झोन व्यतिरिक्त संपूर्ण नागपूर शहरात असा सर्व्हे होणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नुकतंच मुंबई महापालिकेने मुंबई शहरात कोरोना सर्व्हे करण्याचा निर्णय (Corona Survey Nagpur) घेतला होता. त्यानतंर आता नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना सर्व्हेचे आदेश दिले आहे.

या आदेशानुसार उर्वरीत आठ झोनमध्येही हा सर्व्हे करण्यात येणार आहे. ‘कोरोना’विषयक जनजागृती आणि शहरातील आरोग्याची माहिती अशा दुहेरी हेतूने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

या संपूर्ण सर्व्हेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे. आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात येणार आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र राहणार आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावर यांनी केले.

नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर, ज्या कोणाला आरोग्याचा काही त्रास जाणवत असेल त्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत माहिती द्यायची आहे. कुणालाही दवाखान्यापर्यंत जाण्याची गरज नाही.

नागरिकांनी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांची चमू संबंधित घरापर्यंत जाईल आणि तेथे उपचार देईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनानचे पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले (Corona Survey Nagpur) आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.