जगात काय घडतंय? : जपानने बागेतील सर्व फुलं तोडली, अफगाणिस्तानात राष्ट्रपतींच्या स्टाफमधील 20 कोरोना पॉझिटिव्ह
पर्यटकांची गर्दी होऊ नये, म्हणून जपानमधल्या एका बागेतली सर्व फुलं तोडून टाकण्यात आली आहेत.
मुंबई : जगभरात सध्या कोरोनाने अक्षरश: थैमान (Corona Virus Worldwide Update) घातलं आहे. चीनमध्ये जन्म झालेल्या कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. सध्या जगात एकूण 24 लाख 78 हजार 634 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 6 लाख 51 हजार 736 लोक आतापर्यंत कोरोना विषाणूतून बरे झाले आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनाने जगभरातील 1 लाख 70 हजार 389 जणांचा बळीही घेतला आहे. जिथे या कोरोना विषाणूचा जन्म झाला, तो चीन सध्या कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर भारत हा (Corona Virus Worldwide Update) कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत 18 व्या स्थानावर आहे.
इतर देशांमध्ये कोरोनामुळे काय स्थिती आहे?
1. जिथून कोरोना सुरु झाला. तो चीन आता कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत चक्क नवव्या स्थानावर गेला आहे. सध्या पहिल्या स्थानावर अमेरिका आहे. त्यानंतर नंतर स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि तुर्की या देशांचा समावेश आहे. भारत आज दुपापर्यंत कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत 17 व्या स्थानावर होता.
2. पर्यटकांची गर्दी होऊ नये, म्हणून जपानमधल्या एका बागेतली सर्व फुलं तोडून टाकण्यात आली आहेत. इथल्या एका शहरात या मोसमात ट्युलिपला बहर येतो. ते पाहण्यसाठी गर्दी होऊ नये म्हणून तिथली सर्व फुलं तोडून टाकण्यात आली आहेत. जपानमध्ये सध्या 10 हजारांहून जास्त कोरोनाबाधित आहे आणि तिथली लोकसंख्या 12 कोटींच्या जवळपास आहे.
3. अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींच्या स्टाफमधले 20 जण कोरोनाबाधित निघाले आहेत. मात्र, ते राष्ट्रपतींच्या संपर्कात आले होते की नाही, याची अजून माहिती मिळालेली नाही. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी हे 70 वर्षांचे असून माहितीनुसार त्यांना याआधी कॅन्सर सुद्धा झाला आहे. सध्या अफगाणिस्तानात 1 हजारांच्यावर कोरोनाबाधित आहेत आणि अफगाणिस्तानची लोकसंख्या 2 कोटी 81 लाखांच्या आसपास आहे.
अमेरिकेत स्थलांतरबंदी, नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी डोनाल्ड यांचे ‘ट्रम्प’ कार्ड https://t.co/RVS5bwfpAO #DonaldTrump #usimmigration
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 21, 2020
4. चीनी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीआधी परवानगी घेणं अनिर्वाय केल्यानंतर चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. भारताचा हा निर्णय भेदभावकारक आणि मुक्त व्यापाराला छेद देणारा असल्याची प्रतिक्रिया चीननं व्यक्त केली आहे.
5. कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक जास्त रुग्ण बरे होण्याचं प्रमाण फक्त जर्मनीतच सर्वाधिक आहे. जर्मनीत 1 लाख 45 हजारांच्या आसपास कोरोनाचे रुग्ण असले तरी, आतापर्यंत तिथं 91 हजार 500 लोक कोरोनापासून पूर्ण बरे झाले आहेत. जगातल्या कोणत्याही देशाला इतके रुग्ण अद्याप बरे करता आलेल नाहीत.
6. जगातल्या कोरोनारुग्णांपैकी सध्या 31 टक्के रुग्ण एकट्या अमेरिकेत आहेत. अमेरिकेत 7 लाख 64 हजारांहून जास्त कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी 71 हजार लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.
7. स्पेनमध्ये कोरोनामुळे दरदिवशी होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र, तरी खबरदारी म्हणून स्पेनमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. सध्या स्पेनमध्ये 2 लाखांहून जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.
8. लॉकडाऊन हटवलं म्हणजे कोरोना संपला असं समजू नका, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं (Corona Virus Worldwide Update) सर्व देशांना दिला आहे. त्याउलट लॉकडाऊन हटवणं, ही कोरोना फैलावाची दुसरी स्टेज असू शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात आली. म्हणून कोणतीही घाई न करण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं.
9. चीनच्या हुबेई प्रांतात मागच्या 24 तासात कोणताही नवीन कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. सध्या चीनमध्ये 82 हजार 747 कोरोनाचे रुग्ण आहेत.
10. कोरोना मालिकेतल्या विषाणूंसाठी अमेरिकेनं एका इस्रायली संशोधकाला पेटंट देऊ केलं. प्रोफेसर जॉनथन गेरशोनी असं शास्रज्ञाचं नाव आहे. कोरोना विषाणू संशोधनातील ही एक मोठी गोष्ट समजली जात आहे.
11. कॅनडात एका पोलिसाच्या वेशात आलेल्या व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर त्या व्यक्तीनं काही घरं सुद्धा पेटवून दिल्याची माहिती आहे. दरम्यान, नंतर पोलिसांच्या उत्तरात हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ठार केलं गेलं. त्या व्यक्तीनं हे कृत्य का केलं? हे अद्याप स्पष्टपणे कळू शकलेलं नाही.
12. ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यापासून संसदेचं कामकाज काही प्रमाणात सुरु होणार आहे. मात्र, प्रत्येक नेत्यांची संसद परिसरात शिरण्याआधी कोरोना चाचणी घेतली जाणार आहे. सध्या ब्रिटनमध्ये 1 लाख 18 हजार लोक कोरोनाबाधित आहेत.
13. पाकिस्तानात 24 तासात 514 कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. तिथल्या कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 7 हजारांच्यावर गेला आहे. वर्ल्डोमीटरनुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 1 लाख 4 हजार लोकांच्या चाचण्या झाल्या आहेत. पाकिस्तानची लोकसंख्या 22 कोटींच्या घरात आहे.
14. भारतचे सरकार भुतान आणि जॉर्डन सारख्या छोट्या देशांसोबतही उभं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. दोन्ही देशांच्या प्रमुखांशी पंतप्रधान मोदींनी फोनवरुन बातचित केली आहे. कोरोनाच्या विरोधात तिन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील, याची ग्वाही सुद्धा दिली (Corona Virus Worldwide Update).
संबंधित बातम्या :
उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उनची प्रकृती चिंताजनक, अमेरिकन वृत्तपत्रांचा दावा
कोरोनावर लस शोधल्याचा Oxford विद्यापीठाचा दावा, सप्टेंबर महिन्यात लस येण्याची शक्यता
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आम्हालाही द्या, पाकिस्तानची भारतापुढे याचना