अमेरिकेत ‘कोरोना’चा भस्मासूर,चीनमध्ये एकही बळी नाही, मुंबई-पुणे ते अमेरिका-फ्रान्स, ‘कोरोना’ची बित्तंबातमी

जगभरात सोमवारी 5 हजार 208 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. कोणत्या देशात नेमकी काय स्थिती आहे याचा धावता आढावा (Corona Worldwide Latest Update)

अमेरिकेत 'कोरोना'चा भस्मासूर,चीनमध्ये एकही बळी नाही, मुंबई-पुणे ते अमेरिका-फ्रान्स, 'कोरोना'ची बित्तंबातमी
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 8:07 AM

मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने जगभरात थैमान घातल्याने अमेरिकेसारख्या महासत्तेपासून भारतातील लहानशा खेड्यापर्यंत अनेकांना फटका बसला आहे. बहुतांश देश लॉकडाऊन स्थितीमध्ये आहेत. जगभरात कालच्या दिवसात (6 एप्रिल) कोरोनाचे 5 हजारांहून अधिक बळी गेले आहेत. अमेरिकेत एकाच दिवशी 1200 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मुंबई-पुण्यापासून अमेरिका-इटलीपर्यंत कुठे काय स्थिती आहे, याचा हा आढावा (Corona Worldwide Latest Update)

जगात काय स्थिती?

-जगभरात सोमवारी 5 हजार 208 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू -जगभरातील एकूण कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा 74 हजार 635 वर -जगभरात कालच्या दिवसात कोरोनाचे 72 हजार नवे रुग्ण समोर -जगात आतापर्यंत एकूण 13 लाख 44 हजार कोरोनाग्रस्त

अमेरिकेत कोरोनाचा कहर कायम

-अमेरिकेत पुन्हा एक हजाराहून अधिक ‘कोरोना’बळी -सोमवारी 1 हजार 243 कोरोना रुग्णांनी घेतला अखेरचा श्वास -अमेरिकेत एकूण बळींचा आकडा 10 हजारांच्या पुढे -अमेरिकेत एकूण 10 हजार 859 कोरानाग्रस्त दगावले -सध्या अमेरिकेत सर्वाधिक 3 लाख 66 हजार 112 कोरानाग्रस्त रुग्ण

युरोपीय देशांमध्ये कोरोनाची स्थिती

-फ्रान्समध्ये झपाट्याने कोरोनाचा फैलाव -आतापर्यंत फ्रान्समध्ये 98 हजार कोरोनाग्रस्त -फ्रान्समध्ये कालच्या दिवसात 833 रुग्णांचा मृत्यू -फ्रान्सचा एकूण बळींचा आकडा 8 हजार 911 वर

-इटलीत कालच्या दिवसात 636 रुग्णांचा मृत्यू -इटलीत एकूण 16 हजार 523 रुग्णांचा मृत्यू -स्पेनमध्ये कालच्या दिवसात 700 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू

-जर्मनीने एकूण मृत्यू 1 हजार 810 वर रोखले -जर्मनीत एकूण कोरोनाग्रस्त रुग्ण 1 लाख 3 हजार 375

ब्रिटनचे पंतप्रधान ICU मध्ये

-ब्रिटनमध्ये कालच्या दिवसात 439 रुग्णांचा मृत्यू -ब्रिटनच्या पंतप्रधानांना ICU मध्ये हलवले -बोरीस जॉन्सन कालपासून हॉस्पिटलमध्ये, विषाणूचा प्रभाव वाढल्याने ICU मध्ये -जॉन्सन यांची 11 दिवसांपूर्वीच टेस्ट पॉझिटिव्ह -ICU मध्ये हलवण्यापूर्वी कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा

चीनमध्ये काल ‘कोरोना’बळी नाही

-चीनमध्ये पहिल्यांदाच एखाद्या दिवशी कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू नाही -एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेची माहिती -चीनमध्ये एकूण 3 हजार 331 ‘कोरोना’बळी -चीनमध्ये एकूण 81 हजार 740 जणांना कोरोनाची लागण -चीनमध्ये तब्बल 77 हजार 167 कोरोनाग्रस्त ठणठणीत -चीनमध्ये कोरोनाची लागण असलेले सध्या केवळ 1 हजार 242 रुग्ण -चीनमध्ये कोरोनाची लागण असलेले 211 जण सध्या गंभीर

(Corona Worldwide Latest Update)

भारतात रुग्ण वाढतेच

-भारतात कोरोनाबळींचा आकडा 132 वर -देशात काल 16 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू -देशभर कोरोनाग्रस्तांची संख्या 4,757 वर -सोमवारी 479 नव्या रुग्णांची भर

महाराष्ट्रात फैलाव वाढला

-देशभरात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका -महाराष्ट्रात कोरोनाबळींची संख्या 52 वर -महाराष्ट्रात काल कोरोनाचे 8 रुग्ण दगावले -राज्यात 868 लोक कोरोनाबाधित

मुंबईत एकाच दिवशी चौघे दगावले

-मुंबईत 526 जणांना कोरोनाची लागण -मुंबईत कालच्या दिवसात चौघा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू -मुंबईत आतापर्यंत कोरोनाचे 34 बळी -मुंबईत कालच्या दिवसात 70 हून अधिक कोरोनाग्रस्त सापडले

पुण्यातही प्रादुर्भाव वाढतोय

पुण्यात काल कोरोनाचे 41 नवे रुग्ण पुण्यातल्या रुग्णांची संख्या 141 वर 141 पैकी चौघे सध्या अत्यवस्थ पुण्यात विलगीकरणातल्या 1 हजार 423 पैकी 1 हजार 296 अहवाल निगेटिव्ह

(Corona Worldwide Latest Update)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.