AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल 87, आज 96 पोलिसांना कोरोना, आतापर्यंत 714 पोलीस कोरोनाबाधित

राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या (covid positive police) वाढतच आहे. आज आणखी 96 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

काल 87, आज 96 पोलिसांना कोरोना, आतापर्यंत 714 पोलीस कोरोनाबाधित
| Updated on: May 09, 2020 | 12:23 PM
Share

मुंबई : राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या (covid positive police) वाढतच आहे. आज आणखी 96 पोलिसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अवघ्या चार दिवसात 257 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज्यभरातील बाधित पोलिसांचा आकडा 714 वर पोहोचला आहे. यामध्ये 81 अधिकाऱ्यांना आणि 633 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आज एका दिवसात तब्बल 96 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, पोलिसांभोवती विळखा वाढल्याचं चित्र आहे. (covid positive police)

कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 71 अधिकारी आणि 577 अशा एकूण 648 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. दुसरीकडे 10 अधिकारी आणि 51 पोलीस कर्मचारी असे एकूण 61 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

पोलिसांना कोरोनाचा विळखा

  • शनिवार 9 मे –  96
  • शुक्रवार 8 मे – 87
  • गुरुवार 7 मे –  36
  • बुधवार 6 मे – 38

दुर्दैवाने आतापर्यंत पाच पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. आतापर्यंत 194 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले. याप्रकरणात 689 हल्लेखोर नागरिकांना अटक झाली आहे.

5 पोलिसांचा मृत्यू

दुर्दैवाने कोरोनामुळे आतापर्यंत पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील तीन, पुण्यातील एक आणि सोलापुरातील एका पोलिसाचा समावेश आहे.

98 हजार गुन्हे

लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यभरात 98 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तर 19 हजार नागरिकांना अटक करण्यात आलं आहे.

54 हजार वाहने जप्त

राज्यभरात लॉकडाऊनदरम्यान  कलम 188 नुसार 98 हजार 774 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 19 हजार 82 व्यक्तींना अटक करण्यात आलं आहे. 54 हजार 148 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

(covid positive police)

संबंधित बातम्या : 

अवघ्या तीन दिवसात 161 पोलिसांना कोरोना, बाधित पोलिसांची संख्या 618 वर

सोलापुरात कोरोनाविरोधात लढताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 531 वर, दोन दिवसात 74 पोलीस कोरोनाग्रस्त

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.