AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र गुजरात सीमेवरुन राजस्थानकडे जाणारे जवळपास 4 ते 5 हजार कामगार अडकले (Many Worker Traveled Rajasthan) आहेत.

देशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास
| Updated on: Mar 28, 2020 | 12:08 AM
Share

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा (Many Worker Traveled Rajasthan) केली. पण यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या सर्वसामन्य जनतेला मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेले परप्रांतीय, राजस्थानमधील कामगार वर्ग मुलाबाळांसह गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत. लॉक डाऊनपूर्वी अनेक नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केलं होतं. त्यामुळे अनेक कामगार वर्ग स्वत: च्या गावी जाण्यासाठी निघाला आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (Many Worker Traveled Rajasthan) राज्यातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र गुजरात सीमेवरुन राजस्थानकडे जाणारे जवळपास 4 ते 5 हजार कामगार अडकले आहेत. यातील अनेक कामगार मुंबई, कल्याण, पुणे आणि आसपासच्या परिसरातून 100 ते 200 किलोमीटरची पायपीट करत आले आहेत.

मात्र गुजरातच्या सीमा पूर्णत: बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधून गुजरात मार्गे जाणाऱ्या कुणालाही सोडले जात नाही. यामुळे हे सर्व कामगार सीमेवरच अडकून पडले आहेत.

यावेळी प्रशासनाकडून कामगारांना पुन्हा महाराष्ट्रात ज्या ठिकाणावरुन आले आहे. त्या ठिकाणी सोडण्याची व्यवस्था केली आहे. पण या कामगारांनी परत जाण्यासाठी नकार दर्शवला आहे. या कामगारांची संख्या पाहता पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाकडून समोर कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

काही तहसीलदारांकडून अडकलेल्या कामगारांना लाऊड स्पीकरद्वारे परतण्याचे आवाहन करत शांतता राखण्याचे आणि कायदा पाळण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र तरीही हे कामगार एकत नाही. पण पालघर पोलीस अधीक्षक आल्यानंतर त्यांना राजस्थानमधील कामगारांना कुटुंबासह हलवले आहे. या सर्वांना मिळेल त्या वाहनाने महाराष्ट्रात काम करत असलेल्या स्थळी सोडण्यात आले (Many Worker Traveled Rajasthan) आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.