नवी मुंबईत जुन्या बसचे ‘मोबाईल टॉयलेटमध्ये’ रुपांतर
नवी मुंबईत शौचालयांविषयी अभिनव संकल्पना राबवत ‘थ्री आर’ मधील ‘रियूज’ अर्थात ‘टाकाऊतून टिकाऊ’ चा वापर करून मोबाईल टॉयलेट बनवण्यात आलं आहे. | Cycle toilet art buses in Navi Mumbai
या दोन्ही वापरात नसलेल्या बसेसचे मे. सारा प्लास्ट प्रा.लि. यांनी मोबाईल टॉयलेटमध्ये रूपांतरण केले असून ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स यांनी अत्यंत आकर्षक रितीने ‘अप सायकल आर्ट टॉयलेट बस’ कलात्मक स्वरूपात साकारली आहे
Follow us
नवी मुंबईत शौचालयांविषयी अभिनव संकल्पना राबवत ‘थ्री आर’ मधील ‘रियूज’ अर्थात ‘टाकाऊतून टिकाऊ’ चा वापर करून मोबाईल टॉयलेट बनवण्यात आलं आहे.
या वापरात नसलेल्या दोन एन.एम.एम.टी. बसेसचे रूपांतरण करून तयार करण्यात आलेल्या मोबाईल टॉयलेटचे लोकार्पण अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.
एन.एम.एम.टी. च्या दोन वापरात नसलेल्या बसेसचे कलात्मक रूपांतरण करून त्याचा वापर मोबाईल टॉयलेटमध्ये करण्यात आलेला आहे. अशा दोन ‘अप सायकल आर्ट टॉयलेट बसेस’ आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत.
या दोन्ही वापरात नसलेल्या बसेसचे मे. सारा प्लास्ट प्रा.लि. यांनी मोबाईल टॉयलेटमध्ये रूपांतरण केले असून ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स यांनी अत्यंत आकर्षक रितीने ‘अप सायकल आर्ट टॉयलेट बस’ कलात्मक स्वरूपात साकारली आहे
स्वच्छ सर्वेक्षण 2021 ला (Clean Survey 2021) सामोरे जाताना ‘निश्चय केला – नंबर पहिला’ असा निर्धार व्यक्त करत नवी मुंबई महापालिका आयुक्त (Navi Mumbai Municipal Commissioner) अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छताविषयक अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत.
प्रत्येक बसच्या पुढील भागात महिलांकरिता व मागील भागात पुरूषांकरीता स्वच्छतागृह व्यवस्था आहे.
पुरूष व महिलांसाठी प्रवेशाकरिता दोन्ही बाजूस स्वतंत्र दरवाजे आहेत. आतील भागात महिलांसाठी तीन शौचकूपांची तसेच पुरूषांसाठी 2 शौचकुपांची व्यवस्था आहे व पुरूषांच्या भागात 2 मुतारी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.