AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमध्ये दोन दिवसात दोघा शिवसेना नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू

मागील दोन दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (Death of two Shivsena Corporator due to corona).

औरंगाबादमध्ये दोन दिवसात दोघा शिवसेना नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू
| Updated on: Jul 08, 2020 | 12:45 PM
Share

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमध्ये सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गाने शिवसेनेच्या नगरसेवकांवर मोठा आघात केला आहे. मागील दोन दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (Death of two Shivsena Corporator due to corona). नितीन साळवे आणि रावसाहेब आमले असं या नगरसेवकांचं नाव आहे. या घटनेने औरंगाबादमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे.

शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारादरम्यानच आज त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी शिवसेनेचे अन्य एक नगसेवक नितीन साळवे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सलग दोन दिवसात दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णांचा मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

रावसाहेब आमले या नगरसेवकांवर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आज प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेच्या या दोन नगरसेवकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबासह शिवसेना पक्षाचं मोठं नुकसान झाल्याची भावना अनेक शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

नितीन साळवे यांच्यावर मागील 7 दिवसांपासून उपचार सुरु होते. ते औरंगाबादच्या बालाजी नगर वार्डतून निवडून आले होते. त्यांच्यावर 7 दिवस उपचारानंतरही त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. अखेर मंगळवारी (7 जुलै) उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, औरंगाबादेत आज 166 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यासह औरंगाबादमधील कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 300 वर पोहचला आहे. तसेच आतापर्यंत 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये उपचारानंतर 3 हजार 824 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 3 हजार 149 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा :

BJP MLA Abhimanyu Pawar Corona | भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण, मुलालाही संसर्ग

गायकवाड रुग्णाचा मृतदेह सोनावणे कुटुंबाला, सोनावणे रुग्णावर मोरे नावाने उपचार, किरिट सोमय्यांचा गंभीर आरोप

मुंबईत डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनशिवाय कोरोनाची चाचणी शक्य, ‘या’ खासगी लॅबमध्ये टेस्टिंगला परवानगी

संबंधित व्हिडीओ :

Death of two Shivsena Corporator due to corona

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.