JNU हल्ल्यानंतर दीपिका पदुकोणही जखमी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या अमानुष हल्ल्यानंतर देशभरातून याविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे (Deepika Padukon meet injured JNU students).
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) विद्यार्थी आणि शिक्षकांवर झालेल्या अमानुष हल्ल्यानंतर देशभरातून याविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे (Deepika Padukon meet injured JNU students). आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही या जखमी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे. दीपिका पदुकोणने मंगळवारी (7 जानेवारी) स्वतः जेएनयूमध्ये येऊन जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा जखमी आईशी घोष हिची भेट घेतली (Deepika Padukon meet injured JNU students). विशेष म्हणजे आईशी घोषवर हल्ला होऊन ती गंभीर जखमी झाली, तरी दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्याऐवजी आईशी घोष विरोधातच तक्रार दाखल केली. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
दीपिका पदुकोणने मंगळवारी रात्री आईशी घोष आणि अन्य जखमी विद्यार्थ्यांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान दीपिकाने विद्यार्थी संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. यानंतर दीपिकाने विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या हल्लाविरोधी आंदोलनातही सहभाग घेतला.
Beauty is what beauty does. @deepikapadukone shows us what real heroes are all about.#IStandwithDeepika #ISupportDeepika pic.twitter.com/n8ccPdmohr
— Amit Mishra (@Amitjanhit) January 7, 2020
या आंदोलनात JNU विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार देखील उपस्थित होते. यावेळी कन्हैया कुमार यांनी गरीबी, जातीवाद यांच्यापासून मुक्तीच्या घोषणाही दिल्या. तसेच पोलिसांनी लाठीचार्ज केला काय किंवा तुरुंगात टाकलं काय आम्ही मागे हटणार नाही, असाही निश्चय विद्यार्थ्यांनी केला.
दीपिकाने जेएनयूत येऊन जखमी विद्यार्थ्यांप्रति दाखवलेल्या संवेदनशीलतेबद्दल विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी दीपिका पदुकोणचे आभार मानले आहे. कन्हैया कुमार म्हणाले, “विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती दाखवून पाठिंबा दिल्याबद्दल खूप धन्यवाद. तुम्हाला खूप ताकद मिळो. तुम्हाला आज विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला म्हणून ट्रोल केले जाईल किंवा तुमचं शोषणही होईल. मात्र, इतिहास तुमचं धाडस आणि भारताच्या मुळ संकल्पनेसोबत उभं राहण्याच्या कृतीला नेहमी लक्षात ठेवील.”
More power to you @deepikapadukone and thank you for your solidarity and support. You might be abused or trolled today, but history will remember you for your courage and standing by the idea of India. pic.twitter.com/q9WkXODchL
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) January 7, 2020
दीपिकाने सोमवारी (6 जानेवारी) पहिल्यांदा जेएनयूमधील हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली होती.
दीपिका म्हणाली, “लोक आपलं म्हणणं मांडताना घाबरत नाहीत हे पाहून खूप अभिमान वाटला. लोक समोर येत आहेत आणि कोणत्याही भीतीशिवाय आपला आवाज इतरांपर्यंत पोहचवत आहेत हे पाहून खूप आनंद झाला. नागरिकांनी शांत न राहता खुलेपणाने आपले विचार मांडायला हवेत हे खूप महत्त्वाचं आहे.”
दरम्यान दीपिकाने जखमी विद्यार्थ्यांची भेट घेत त्याची विचारपूस केली आणि त्यांना पाठिंबाही दिला. जखमी विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांसह काही धार्मिक गटांकडून दीपिका पदूकोणच्या आगामी छपाक चित्रपटाविरोधात बहिष्काराचं आवाहन केलं जात आहे. सोशल मीडियावर बॉयकॉट छपाक हा हॅशटॅगही ट्रेंड केला जात आहे.
RT if you will Boycott Movies of @deepikapadukone for her Support to #TukdeTukdeGang and Afzal Gang pic.twitter.com/LN5rpwjDmT
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) January 7, 2020
दीपिकाला लक्ष्य केल्यानंतर अनेक लोक दीपिकाच्या बाजूनेही उभे राहतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर आय सपोर्ट दीपिका हा ट्रेंडही झाला आहे.