Marathi News Latest news Deepika padukone sara ali khan shraddha kapoor in ncb office for investigation some photos
PHOTO : दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर NCB कार्यालयात, प्रश्नांची सरबत्ती
दीपिका पादुकोण सारा अली खान, श्रद्धा कपूर या तिघींची चौकशी सुरु आहे. (Deepika Padukone, Sara Ali Khan, Shraddha Kapoor in Ncb office for Investigation)
Follow us
सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला. हे ड्रग्ज कनेक्शन प्रकरण बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींपर्यंत पोहोचलं आहे.
दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या तिघींची आज (शनिवार 26 सप्टेंबर) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी होत आहे.
एनसीबीने दीपिकाला दिलेल्या चौकशीच्या वेळेआधीच 15 मिनिटं दीपिका एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली.
दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशही एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.
NCB कडून चौकशीपूर्वी दीपिकाचा फोन ताब्यात घेण्यात आला आहे.
दीपिका आणि करिश्माची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे.
एनसीबीकडून सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला 10.30 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
मात्र त्या दोघींनीही एनसीबीकडे वेळ वाढवून मागितला होता.
जवळपास 11.48 सुमारास श्रद्धा कपूर एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली.
श्रद्धा कपूर हिचाही फोन ताब्यात घेण्यात आला आहे.
सारा अली खान हिने चौकशीला येण्यापूर्वी तिचे वडील अभिनेता सैफ अली खान यांच्याशी चर्चा केली
दुपारी एकच्या सुमारात सारा अली खान एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली
दीपिका आणि श्रद्धाप्रमाणे साराचाही फोन ताब्यात घेण्यात आला आहे.
दीपिका, श्रद्धा आणि सारा यांच्या या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.