या चित्रपटांमुळे घडलं बिपाशा करिअर, अजनबी चित्रपटातली ही खलनायिकेची भूमिका चाहत्यांच्या पसंतीला

दिल्लीत जन्मलेल्या बिपाशाने तिचं शालेय शिक्षण दिल्लीत पुर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षण कोलकत्यातील शाळेत घेतलं. बिपाशाची 12 वी झाल्यानंतर तिने आपलं करिअर मॉडेलिंग क्षेत्रात करायचं ठरवलं. ती 1996 मध्ये एका कंपनीच्या मॉडेलिंगचं काम मिळालं.

या चित्रपटांमुळे घडलं बिपाशा करिअर, अजनबी चित्रपटातली ही खलनायिकेची भूमिका चाहत्यांच्या पसंतीला
बिपाशा बासू (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 7:00 AM

मुंबई – मुंबईने आतापर्यंत अनेकांना भरभरून दिल्याची उदाहरणं आहेत. त्यात अनेक सेलिब्रिटीचा समावेश आहे. आज आपण बिपाशा बासू (bipasha basu)विषयी बोलत आहोत, कारण आज तिचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्त तिचे चालत्यांना आवडलेले चित्रपट याविषयी आपण चर्चा करणार आहोत. बिपाशा बसूचा जन्म 7 जानेवारी 1979 साली दिल्ली (delhi) येथे झाला. तसेच तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं होतं म्हणून त्यादृष्टीने तीने सुरूवातीपासूनचं प्रयत्न केले आणि ती त्यात यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात तिथं यश येणं हे खूप महत्त्वाचं असतं. पण बिपाशाने अधिक मेहनत घेतल्याने तिचं करिअर (career) झालं असं अनेकजण म्हणतात. तसेच तिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक भाषांमध्ये चित्रपट केले आहेत. त्यामुळे तिचा फॅनवर्ग देशात अनेक ठिकाणी आहे.

खलनायिकेची भूमिका लोकांना आवडली

दिल्लीत जन्मलेल्या बिपाशाने तिचं शालेय शिक्षण दिल्लीत पुर्ण केलं. त्यानंतर पुढील शिक्षण कोलकत्यातील शाळेत घेतलं. बिपाशाची 12 वी झाल्यानंतर तिने आपलं करिअर मॉडेलिंग क्षेत्रात करायचं ठरवलं. ती 1996 मध्ये एका कंपनीच्या मॉडेलिंगचं काम मिळालं. त्यानंतर ती पहिल्यांदा प्रकाशात आणि तिथून तिच्या करिअरला खर्या अर्थाने सुरूवात झाली. 2001 साली तिने अजनबी चित्रपटातून बॉलिबूडमध्ये पदार्पण केले. त्या चित्रपटात बिपाशाला खलनायिकेची भूमिका मिळाली. पण ती खलनायिकेची भूमिका लोकांना इतकी आवडली की लोकांनी तिचं कौतुक केलं.

राज चित्रपटानंतर अधिक प्रसिध्दी 

त्यानंतर राज चित्रपट मिळाला, त्या चित्रपटात ती इतकी प्रसिध्दीस आली की तिची गणना बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रीशी केली जाऊ लागली. तसेच राज चित्रपट सुध्दा त्या काळात चांगला चालला. त्या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड सुध्दा मिळाला होता. तिथून पुढे ती अधिक प्रसिध्दीच्या झोतात आली. मेरे यार की शादी, चोर मचाये शोर हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून पडले. त्यानंतर बिपाशाने जिस्म या चित्रपटातून जोरदार कमबॅक केलं. त्या चित्रपटाला चांगली प्रसिध्दी मिळाल्यानंतर बिपाशाला जमीन, बरसात, रूद्राक्ष हे चित्रपट मिळाले.

सुपरहीट चित्रपट

त्यानंतर आलेले बरेच चित्रपट तिचे हीट ठरले. यात ‘नो एन्ट्री’, ‘कॉर्पोरेट’, ‘हेराफेरी’, ‘ओमकारा’ ‘धूम-२’ या लोकप्रिय सिनेमांचा समावेश होता. आपल्या ग्लॅमरस अभिनयामुळे बिपाशाने प्रशंसा मिळवली होती. ओमकारातील आयटम नंबर ‘बिडी जलाइले’ ऑल टाईम हिट ठरले. हे वर्ष बिपाशा बासूच्या कारकिर्दीतील सर्वात महत्वाचे वर्ष होते. बिपाशाने स्वतःपेक्षा ५ वर्षाने लहान असलेल्या करणसिंग ग्रोव्हरसोबत 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले. बिपाशा व करण यांनी 2015 साली ‘अलोन’ हा चित्रपट एकत्र केला होता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली होती. यावेळी करण त्याची पत्नी अभिनेत्री पत्नी जेनिफर विंगेट यांचा नुकताच घटस्फोट झाला होता.

Video | आधी दुवा, मग हात जोडून अखेरचं दर्शन, नंतर शाहरुख थुंकला? पूर्ण व्हिडीओ पहा काय घडलं

Rip Lata Mangeshkar : दिदींच्या जाण्याने देशभर शोक, भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप

Rip Lata Mangeshkar : अखेरचा हा तुला दंडवत… लाडक्या गान सम्राज्ञीला अखेरचा निरोप; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नेते, सेलिब्रिटींची अंत्यसंस्काराला हजेरी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.